Devendra Fadnavis चक्रधर स्वामींचा जन्म जरी गुजरातचा असला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती, असंही सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन महोत्सवामध्ये नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित महानुभाव पंथाच्या संत महंतांचा आशीर्वाद प्राप्त करून पंथीयांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. Devendra Fadnavis
याप्रसंगी भाषणात फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामींचा जन्म जरी गुजरातचा असला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी महानुभाव पंथाला भारतात आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेले. त्यांच्या माध्यमातूनच महानुभाव पंथाची अतुलनीय ग्रंथसंपदा तयार झाली. सर्व प्रकारच्या धर्मचर्चा मराठीतून व्हाव्यात हा आग्रह धरला. यामुळेच मराठीतील आद्यग्रंथ रिद्धपुरमध्ये महानुभाव पंथीयांमार्फत तयार झाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लागणारी ताकद यामुळे मिळाली. समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे. यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाङ्मय जीवंत ठेवण्याचे काम महानुभाव पंथाने केले.
याशिवाय, सुमारे 28 वर्षांपूर्वी, चिचभवनला महानुभाव पंथाचे मोठे संमेलन झाले तेव्हा महापौर असताना त्या संमेलनाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी महानुभाव पंथाशी तयार झालेले ऋणानूबंध आजन्म असेच वाढत राहतील. यातूनच सत्तेत आल्यावर ₹230 कोटींचा रिद्धपूर विकास आराखडा तयार करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री असताना मराठी भाषा विद्यापीठासंदर्भात समिती तयार केली होती. मध्यंतरी सरकार बदलले परंतु नंतर श्री चक्रधर स्वामींच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलो. यावेळी या समितीच्या अहवालाची अंमलबाजवणी करत विद्यापीठाच्या निर्मितीसाठी शासन निर्णय काढला.
तसेच आता पहिले मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला निर्माण होऊन कुलगुरूची नियुक्ती देखील झाली. मागील काळात याबाबत सुमारे ₹24 कोटींचे काम झाले परंतु बरीच कामे अजून बाकी आहेत. या अर्थसंकल्पात रिद्धपूर विकास आराखड्याच्या पुढच्या टप्प्याचे ₹25 कोटी देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. यासोबतच श्री क्षेत्र पांचाळेश्वर तसेच बिश्नुरचे देवस्थान अशा विविध तीर्थक्षेत्रांना भगवान चक्रधर स्वामींच्या अवतरण दिनी मान्यता देऊन ₹78 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. काटोल संदर्भात ₹25 कोटींचा आराखडा तयार करून निधी देण्याचा निर्णय देखील घेतला. अशी माहिती त्यांनी दिली.Devendra Fadnavis
याचबरोबर नागपूरमध्येही महानुभाव पंथाचे चांगले भवन निर्माण करण्यासाठी चिचभवन येथे जागा बघितली असून सर्व पूर्तता होत असल्यास येथे हे भवन लवकरच निर्माण करण्यात येईल. 800 वर्ष परकीय आक्रमकांपासून जी मंदिरे महानुभाव पंथीयांनी वाचवली आता त्यांचे संवर्धन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यात सरकार मागे पडणार नाही हा शब्द यावेळी दिला. यासोबतच रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची सुंदर इमारत उभी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचे उदघाटन करण्याचे आश्वासन देखील दिले. यावेळी महानुभाव पंथाचे जेष्ठ संत महंत तसेच खासदार कृपाल तुमाने, आमदार परिणय फुके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Devendra Fadnavis said Govt will conserve temples saved by Mahanubhava Panth
महत्वाच्या बातम्या
- Solution Provider : पंतप्रधान मोदींच्या यशस्वी परराष्ट्र धोरणामुळे आज भारत जगात ‘सोल्युशन प्रोव्हायडर’च्या भूमिकेत
- Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतील ‘AIIMS’मध्ये व्हेंटिलेटरवर हलवले
- Mohan Bhagwat : समर्पित संघ स्वयंसेवकांमुळे पूर्वांचल – मणिपूरमधल्या स्थितीत सुधारणा; सरसंघचालकांचा विश्वास!
- Vladimir Putin : ‘भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थ होऊ शकतात…’, युक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चेवर पुतिन यांची मोठी घोषणा