• Download App
    ठाकरे + पवारांचे माध्यमी नॅरेटिव्हचे बाऊन्सर्स; पण त्यावर फडणवीसांची सभांची सेंच्युरी!! Devendra Fadnavis completed 100 meetings

    ठाकरे + पवारांचे माध्यमी नॅरेटिव्हचे बाऊन्सर्स; पण त्यावर फडणवीसांची सभांची सेंच्युरी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ठाकरे + पवारांना सहानुभूती आहे, असा दावा करून मराठी माध्यमे त्यांची तळी उचलून धरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अश्वमेध महाराष्ट्र रोखेल, असे नॅरेटिव्ह मराठी माध्यमे चालवत आहेत. परंतु या नॅरेटिव्हला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 100 सभा घेत छेद दिला आहे. Devendra Fadnavis completed 100 meetings

    चौथ्या टप्प्याचं मतदान 13 मे रोजी होईल. त्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर राहिले. त्यांच्या सभांना महाराष्ट्राच्या सर्व विभागांमधून मोठी मागणी होती आणि आहे. पहिल्या टप्प्याची घोषणा होताच फडणवीसांनी दौरा घोषित केला. आता चौथा टप्पा पार पडत असताना फडणवीसांनी सभांची सेंच्युरी मारली. पाचवा टप्पा अजून बाकी आहे. फडणवीसांच्या रेकॉर्ड ब्रेक सभा भाजपसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजकीय ताकद वाढल्याचं यातून दिसून येतं, असं भाजप समर्थक व्यक्त करतायेत. मोदी, शाह आणि योगींप्रमाणे फडणवीसांची लोकप्रियता वाढत असल्याचे ते निदर्शक आहे.

    फडणवीस फक्त सभा घेत नाहीत, तर त्या सभांच्या आगे मागे महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन जमिनी स्तरावरचे नियोजन करण्यातही फडणवीस आघाडीवर आहेत.

    फडणवीसांच्या खालोखाल उद्धव ठाकरे यांच्या सभा गाजत आहेत. त्यांनी आतापर्यंत 64 सभा घेतल्या आहेत. एकनाथ शिंदेही 40 सभांच्या आसपास आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 10 जागांवर लढत आहे, पण पवारांनी 40 पेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत. यामध्ये पवारांनी बारामती आणि माढा मध्ये सर्वाधिक सभांचा सपाटा लावला होता.

    महाराष्ट्रात 99, तर केरळात 1 सभा

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 सभांचा आकडा पूर्ण केला आहे. असं करणारे ते राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकमेव नेते आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्रातच नव्हे तर केरळमध्ये ही एक सभा घेतली. राज्यात 99 आणि केरळात एक अशा 100 सभा त्यांनी घेतल्यात. भाजपने 400 पार जाण्याचा नारा दिला आहे. हे करताना घटक पक्षांच्या उमदेवारांची विजय निश्चिती महत्त्वाची आहे. यासाठी मोदी, शाहांप्रमाणे फडणवीसांच्या सभेची ही मागणी वाढली होती. राज्यात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. फडणवीसांनी 130 हून अधिक सभा घेण्याचं नियोजन आखलं आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी या सभा होणार आहेत. आकडेवारी पाहिली तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी 3 सभा फडणवीस घेत आहेत. सभांचा हा वाढता आकडा फडणवीस म्हणजेच विजय निश्चिती असं समीकरण प्रस्थापित करत असल्याचं बोललं जातं.



    पुण्यात शतक

    फडणवीसांनी आपली 100 वी सभा पुण्यात घेतली. पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसने ही जागा महाविकास आघाडीतून मिळवली. कसब्याचे आमदार रविंद्र धनगेकर खासदारकीची निवडणूक लढत आहेत. भाजपसाठी ही निवडणूक अडचणीची ठरावी, यासाठी पवार आणि ठाकरेंनी पुर्ण ताकद लावली आहे. अशात फडणवीसांची सभा इथं गेमचेंजर असल्याचं सांगण्यात येतंय. पुण्याची जागा फडणवीसांनी गांभीर्यानं घेतल्याचं बोललं जातंय. आज पुण्यात फडणवीसांनी प्रचाराची सांगता केली. शिवाय आज पुण्यातच फडणवीसांचा मुक्काम असणार आहे. 13 मेला राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

    लोकप्रियता वाढली

    फडणवीसांनी 100 सभा घेतल्या आहेत. भाजपसह महायुतीतील शिंदे गट आणि पवार गटासाठीही फडणवीसांनी सभा घेतल्या. फडणवीसांच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे हा आकडा वाढल्याचं बोललं जातंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की ओबीसी आरक्षणाचा, फडणवीसांनी यातून मध्यमार्ग काढला. दोन्ही समाजाचा असंतोष सामंज्यस्यात बदलला. पुढं मायक्रो ओबीसी समाजांना महामंडळं दिली. अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असं केलं. दिव्यांग बांधवांसाठी विशेष तरतुदी केल्या. दलित आणि आदिवासी प्रश्नांनाही फैलावर घेतले. त्यातूनही योग्य मार्ग काढले. फडणवीसांचं हेच सोशल इंजिनिअरिंग आता फळाला आल्याचं चित्रं आहे.

    Devendra Fadnavis completed 100 meetings

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस