नाशिक : Devendra fadnavis जनादेश चोरून 2019 मध्ये त्याला ठेवले अडवून; पण 2024 मध्ये देवाभाऊ आला घासून आणि ठासून!! Devendra fadnavis
महाराष्ट्र भाजप विधिमंडळ नेतेपदावर निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणात नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमका हाच उल्लेख आवर्जून केला. खरं म्हणजे 2019 मध्ये देखील महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या भाजप महायुतीला कौल दिला होता. पण तो जनादेश चोरून त्यावेळी सरकार बनविले गेले. ते अडीच वर्षे चालले. पण त्या अडीच वर्षात त्या सरकारने आपल्या सगळ्यांना भरपूर त्रास दिला. आपली कामं अडकवून ठेवली. महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना अडवून ठेवल्या. पण त्या काळात आपला एकही आमदार सोडून गेला नाही. आपण सगळ्यांनी त्रास सहन केला. मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अमित शाहांच्या मार्गदर्शनाखाली कष्ट केले. त्यातून 2024 चा महायुतीचा महाविजय साकार झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. Devendra fadnavis
Ratapani Sanctuary : मध्य प्रदेशातील रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प घोषित
2019 मध्ये जनादेश चोरताना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केवळ “देवेंद्र नको” हे टार्गेट ठेवले होते. पवारांनी तर सगळ्या महाराष्ट्र मराठा वर्चस्वाच्या जातीवादाच्या दिशेने नेला होता. त्यांना त्यांच्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसवायचा होता. त्यातला एक छोटा घटक मनोज जरांगे हा होता. एवढे सगळे करूनही पवारांना महाराष्ट्राचा जनादेश मिळवता आला नाही उलट त्यांना राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस आमदार संख्येचा तळ गाठल्याचे पाहावे लागले. पवारांच्या नादी लागून ज्या उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भोगले, त्यांचा पक्ष 2024 मध्ये बाराच्या भावात गेला. जनतेने त्यांच्या शिवसेनेला कौल नाकारला. Devendra fadnavis
वेगवेगळ्या राज्यांमधील जातीय आरक्षणाची आंदोलने कशी हाताळायची हे माहिती आहे, असे अमित शाह म्हणाले होते. याचा प्रत्यय फडणवीसांनी महाराष्ट्रात दिला. जातीभेदाच्या मुद्द्यावर मात करून दाखवली. “बटेंगे तो कटेंगे” आणि “एक है तो सेफ है” या घोषणांनी महाराष्ट्रात काम केले. “सजग रहो” आंदोलनाने मतदानाचा टक्का वाढविला. महाराष्ट्राच्या निवडणुकीने दोन संदेश दिले, “एक है, तो सेफ है” आणि “मोदी है, तो मुमकिन है”, याची आठवण फडणवीस सांनी करून दिली
2019 पासून 2024 पर्यंत अशा वेगवेगळ्या अडथळ्यांवर मात करत अखेर तो पुन्हा आला. 2014 मध्ये मोदींनी त्याची निवड केली होती. 2019 मध्ये त्याच्या नावाने जनादेशाचा कौल होता, पण त्याचा अधिकार हिसकावला गेला होता, पण 2024 मध्ये मात्र तो पुन्हा आला आणि यावेळी घासून आणि ठासून आला.
Devendra fadnavis chief minister again with more power
महत्वाच्या बातम्या
- Ratapani Sanctuary : मध्य प्रदेशातील रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प घोषित
- Defence संरक्षण अधिग्रहण परिषदेने 22 हजार कोटी रुपयांच्या पाच प्रस्तावांना दिली मंजुरी
- Eknath Shinde : एकीकडे एकनाथ शिंदेंची राजी – नाराजी; दुसरीकडे भाजपची हिंदू ऐक्याच्या नव्या राजकारणाची पायाभरणी!!
- Israeli mosques : इस्रायलच्या मशिदींमधून स्पीकर हटणार, पोलिसांना स्पीकर जप्त करण्याचे आदेश