• Download App
    Devendra Fadnavis पुणे महानगराचा स्ट्रक्चरल प्लॅन जलदगतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश; 220 प्रकल्पांसाठी 32,523 कोटींचा निधी मंजूर

    पुणे महानगराचा स्ट्रक्चरल प्लॅन जलदगतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश; 220 प्रकल्पांसाठी 32,523 कोटींचा निधी मंजूर

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, नागपूर येथे ‘पुणे महानगर नियोजन समिती’ची बैठक झाली. पुणे महानगरचा स्ट्रक्चरल प्लॅन वेगात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

    राज्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता शहरवासियांना नागरी सोयी-सुविधा देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. पुणे शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांच्या अंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी ₹32,523 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

    – एकाच प्राधिकरणाकडे विकासाची जबाबदारी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे महानगरसाठी विहित कालमर्यादेत ‘स्ट्रक्चर प्लॅन’ तयार करताना त्यामध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण यांचा विचार करण्यात यावा. प्लॅन तयार करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. विकासाचे नियोजन करताना विविध प्राधिकरणांकडे काही क्षेत्रांच्या विकासाची जबाबदारी न देता, संपूर्ण क्षेत्राचा विकास एकाच प्राधिकरणाने करावा.

    पुणे महापालिकेत 30 जून 2021 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांचे विकास नियोजन पुणे महापालिकेने करावे. ‘पुणे ग्रोथ हब’साठी विकास आराखडा शासनाच्या मित्रा संस्थेकडून करण्याबाबत पडताळणी करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

    पुणे शहरामध्ये ‘माण- म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग’ योजनेचे काम गतीने पूर्ण करावे. शहरामध्ये एकीकृत टाऊन प्लॅनिंगच्या 15 योजनांवर काम सुरू असून यामध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. वेळेत योजना पूर्ण झाल्यास त्याचा लाभ सर्वांना होतो, त्यामुळे कुठेही विलंब न लावता या योजनांची कामे पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

    पुणे विद्यापीठ जवळील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची वाट न बघता नागरिकांच्या सेवेसाठी तो सुरू करावा. पुणे महानगर समितीच्या सर्व सदस्यांसमवेत कार्यक्रमाचे आयोजन करावे, त्यामध्ये सर्वांची मते जाणून घेत पुणे शहरासाठी भविष्याचा वेध घेणारा ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’ तयार करण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देशित केले.

    – पुणे महानगर प्रदेशात सुरू असलेली विकासकामे

    – पुणे महानगरात 589 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची 127 कामे सुरू
    – शहरांतर्गत 83 किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प
    – पुणे शहरा अंतर्गत विकास केंद्र, औद्योगिक क्षेत्र, विमानतळ जोडणीसाठी रस्त्यांची कामे सुरू
    – पूल आणि उड्डाणपुलाची तीन कामे सुरू
    – गृहनिर्माण प्रकल्पांची तीन कामे पाणीपुरवठा योजनांची चार कामे सुरू असून वाघोली पाणीपुरवठा योजना पूर्ण

    पुणे महानगरात सुरू होणारी कामे

    – पवना, इंद्रायणी, मुळा व मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनाची 3 कामे
    – चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 17 कामे, 10 पर्यटन विकास केंद्रांची कामे
    – स्कायवाॅकचे एक काम, मल्टी मॉडेल हब प्रकल्पाची 5 कामे लवकरच सुरू होणार

    – येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग

    – येरवडा ते कात्रज दरम्यान 20 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे
    – या महामार्गाच्या फिजीबिलिटी पडताळणीचे काम सुरू असून यासाठी अंदाजीत ₹7500 कोटींच्या निधीची आवश्यकता

    यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, स्थानिक आमदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    Devendra Fadnavis chaired the meeting of the ‘Pune Metropolitan Region Development Authorit

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Madat Mash Land : हिवाळी अधिवेशन: ‘मदत माश’ जमिनी होणार मोफत नियमित; हैदराबाद इनामे व रोखे अनुदाने रद्द सुधारणा विधेयक मंजूर

    Ravi Rana, : बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, आमदार रवी राणांची मागणी, परवानगी दिल्यास दोन बिबटे पाळणार!

    CM Fadnavis : पार्थ पवारांवर अद्याप का गुन्हा नाही? मुख्यमंत्री म्हणाले- FIR मध्ये नाव आले म्हणजे व्यक्ती दोषी आहे असे होत नाही