• Download App
    Devendra fadnavis पानिपतच्या रणभूमीवर साजरा केला मराठ्यांचा शौर्य दिवस; आदरांजली वाहणारे फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री यशवंतरावांनंतर!!

    पानिपतच्या रणभूमीवर साजरा केला मराठ्यांचा शौर्य दिवस; आदरांजली वाहणारे फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री यशवंतरावांनंतर!!

    विशेष प्रतिनिधी

    पानिपत : पानिपतच्या रणभूमीवर साजरा केला मराठ्यांचा शौर्य दिवस; आदरांजली वाहणारे फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री यशवंतरावानंतर!!

    14 जानेवारी 1761 रोजी पानिपतच्या रणभूमीवर मराठा विरुद्ध अफगाण असे युद्ध झाले. देशातल्या परकीय आक्रमकांना हाकलून लावण्यासाठी मराठ्यांनी शौर्याची पराकाष्ठा केली. तो 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस पानिपतच्या रणभूमीवर आज साजरा करण्यात आला.

    या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. पानिपतच्या रणभूमीवर मराठ्यांचे शौर्य स्मारक आहे, त्या स्मारकावर जाऊन फडणवीस यांनी सर्व मराठा वीरांना आदरांजली वाहिली. प्रत्यक्ष पानिपतच्या रणभूमीवर जाऊन मराठा वीरांना आदरांजली वाहणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री ठरले. त्याआधी यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना पानिपत मध्ये जाऊन मराठा वीरांना आदरांजली वाहिली होती.

    आजच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव, रक्षा खडसे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे आदी नेते उपस्थित होते.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मराठ्यांनी एकजुटीने पानिपतचे युद्ध लढले देशाला परकीय आक्रमकान पासून वाचविले. अफगाण शासकांनी मराठ्यांची एवढी दहशत खाल्ली की त्यानंतर त्यांनी कधीही भारतावर आक्रमण करायची हिंमतच केली नाही, अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

    Devendra fadnavis celebrate shoor divas in panipat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस