• Download App
    Devendra Fadnavis BJP Victory Maharashtra Local Body Elections New Record 3302 Corporators Photos Videos Report देवेंद्र फडणवीस म्हणाले- सकारात्मक प्रचार केला, विकासावर मते मागितली, भाजपचे 3302 नगरसेवक, हा नवा विक्रम

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- सकारात्मक प्रचार केला, विकासावर मते मागितली, भाजपचे 3302 नगरसेवक, हा नवा विक्रम

    Devendra Fadnavis,

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीचे सर्वाधिक 213 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 117 नगराध्यक्ष मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Devendra Fadnavis

    महाराष्ट्रात भाजपाचे 129 नगराध्यक्ष विजयी झाले असून 3 हजारांपेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपाला 2017 पेक्षा मोठा विजय मिळाला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे मोठे यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. भाजपने 129 नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून महायुतीच्या तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते 75 टक्के आहेत. नगरसेवकपदावर भाजपने नवा रेकॉर्ड केला आहे. यापूर्वीच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 1602 नगरसेवक होते, आता त्याच्या दुपटीचे 3302 नगरसेवक आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.Devendra Fadnavis



    देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. सगळ्या सभांमध्ये मी विकासावर मत मागितली. तसेच आम्ही काय विकास करणार आहोत याची ब्ल्यु प्रिंट मांडली आणि याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकांनी आमच्या विकास कामांवर दिलेली पावती आहे. आज देशात मोदींच्या नेतृत्वात भाजपबद्दल जी काही सकारात्मकता आहे याचा फायदा आम्हाला झालेला आहे.

    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर ही जबाबदारी दिली होती. प्रत्येक विभागात आमचे जे नेते आहेत, चंद्रकांत दादा असतील, गिरीश महाजन असतील, मराठवाड्यातले नेते असतील, सर्वांनीच चांगले काम केले आहे. सगळ्या मंत्र्यांना आम्ही जी जबाबदारी दिली होती, ती देखील त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावली आहे. हा विजय आमच्या सगळ्यांचा आहे. लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे, त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

    महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच

    2014 पासून कोणतीही निवडणूक काढा, तेव्हा पासून झालेल्या सगळ्या निवडणुकीत भाजपने चांगला विजय मिळवला आहे आणि शहर आणि गावांच्या विकासावर आम्ही भर दिला आहे. भाजप हा सर्व जातींचा आहे आणि महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच आहे. रत्नागिरीमध्ये आम्ही महायुतीत लढलो तिथे आम्हाला चांगला यश मिळाले आहे, सिंधुदुर्गमध्ये युती नव्हती, तिथे आम्ही काही ठिकाणी हरलो, काही ठिकाणी जिंकलो. परंतु, आम्ही जिथे लढलो, तिथे आम्ही जिंकलोच आहोत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    फडणवीसांचा विरोधकांना टोला

    आता विरोधक हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, कारण त्यांना पराभव होणार हे माहीत होते. परंतु, भाजप किंवा महायुती म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो, कारण जे कार्यकर्ते आम्हाला विधानसभा किंवा लोकसभेत आम्हाला निवडून आणतात, त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही त्यांच्यासाठी गेलेच पाहिजे.

    नागपूरमधील विजयाचे चंद्रशेखर बावनकुळेंना श्रेय

    नागपूर जिल्ह्यात खूपच चांगले यश आम्हाला मिळाले आहे. विशेषतः आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे याच्यात विशेष श्रेय आहे, कारण त्यांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेऊन सगळ्या लोकांना सोबत ठेऊन काम केले. कामठीमध्ये पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. एकूणच तुम्ही बघितले तर 15 जागा अशा आहेत जिथे आमचे बहुमत होते, पण दुर्दैवाने अत्यंत कमी फरकाने आमचे नगराध्यक्ष पराभूत झाले.

    सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

    चंद्रपूरचा जो विषय आहे, तिथे आम्ही जिथे यश मिळू शकले नाही, त्याची कारणमीमांसा आम्ही करू आणि जी कमतरता आहे ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे फडणवीस म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांच्या विषयी बोलताना फडणवीस म्हणाले, पक्षाची दारे कुठल्या व्यक्तीला समजासाठी बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींसाठी बंद असू नयेत. पक्ष हा बिनादारांचा असला पाहिजे, फक्त प्रवेश देताना योग्य आहेत की नाही हे पाहणे गरजेचे आहे. समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही त्यांना पूर्ण ताकद देऊ, असे फडणवीस म्हणाले.

    नगरपालिकेपेक्षा जास्त जागा महापालिकेच्या निवडणुकीत आमहाल मिळतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिथे महायुती आली आहे आणि महायुती नाही आली अशा सर्वच ठिकाणी आम्ही विकासकामे करणार आहोत, निधी उपलब्ध करून देणार आहोत, असेही फडणवीस यांनी म्हटले.

    Devendra Fadnavis BJP Victory Maharashtra Local Body Elections New Record 3302 Corporators Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : नकली को किया ढेर, UBT को पता चला कौन असली शेर; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    Maharashtra Local Body : राज्यातील 288 नगरपालिकांचे निकाल; भाजप सर्वात मोठा पक्ष; मोदींनी केले अभिनंदन

    कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले!!