• Download App
    सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई - देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis believes that Sunetra Pawar will win from Baramati Lok Sabha constituency

    सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई – देवेंद्र फडणवीस

    ‘ही लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी देखील नाही’ असंही फडणवीस म्हणाले आहेत. Devendra Fadnavis believes that Sunetra Pawar will win from Baramati Lok Sabha constituency

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ‘सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी उपस्थित जनसागर बारामतीचा निर्णय आताच सांगत आहे. सुनेत्राताई ऐतिहासिक मताधिक्क्याने दिल्लीला जातील हा माझा विश्वास आहे.’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा महायुती उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता महायुतीच्या जाहीर सभेत उपस्थित नागरिकांना त्यांनी संबोधित केले.

    यावेळी फडणवीस म्हणाले, ‘ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार नाही किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी देखील नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. बारामतीचा खासदार पंतप्रधान मोदींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने हे महत्वाचे. विकासाला मत द्यायचे की विनाशाला मत द्यायचे हा निर्णय बारामतीकरांचा आहे.’

    याशिवाय, ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताच्या विकासयात्रेला गती देण्यासाठी बारामतीकर सुनेत्राताई पवार यांच्यामार्फत ‘अबकी बार, 400 पार’ चा संकल्प पूर्ण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतील हा विश्वास आहे.’ असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, माजीमंत्री विजय शिवतारे, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार राहुल कुल, आमदार भिमराव (आण्णा) तापकीर, आमदार दत्तात्रय भरणे, मुरलीधर मोहोळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    Devendra Fadnavis believes that Sunetra Pawar will win from Baramati Lok Sabha constituency

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी