• Download App
    Devendra Fadnavis attack देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; मतांसाठी मविआचे नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत

    Devendra Fadnavis attack देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; मतांसाठी मविआचे नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या व्हिडिओवरून भाजप आक्रमक झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला येथील प्रचारसभेत नोमानी यांचा व्हिडिओ ऐकवत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. देशाला अस्थिर करण्याचे काम सुरू असून महाविकास आघाडी त्यांच्यासोबत सामील झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. आता एक राहिलो तरच सेफ राहू असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सभेमध्ये एक है तो सेफ है…चा नारा दिला.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज ज्या प्रकारचे लांगुलचालन काँग्रस, शरद पवार एनसीपी आणि उबाठाच्या वतीने सुरू आहे. आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही. आम्ही लाडकी बहीण योजना सगळ्या धर्माच्या बहिणींना दिली. काही पक्ष व्होटांच्या नावावर ध्रुवीकरण करत असतील तर मी तुम्हाला जागे करायला आलो आहे. उलेमा काउंसिलने मविला 17 मागण्या दिल्यात. त्यातील काही मागण्या खतरनाक आहे. मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण, 2012 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्रात झालेल्या दंगलींमध्ये पकडलेल्या मुस्लिमांवरील सगळ्या केसेस मागे घ्या, अशा या मागण्या आहेत. महाविकास आघाडीने मतांसाठी या सगळ्या मागण्या मान्य करण्याबाबत लेखी दिले आहे. मविआकडून मतांसाठी पाय चाटणे सुरू केले आहे. आता त्यांनी व्होट जिहादचा नारा दिला आहे, असे फडणवीस म्हणाले.



    व्होट जिहादसाठी हे उलेमानचे तळवे चाटत आहेत

    यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सज्जाद नोमानी यांची व्हिडिओ क्लिप भाषणात ऐकवली. त्यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, आता व्होट जिहादचा नारा दिला आहे. व्होट जिहादचे सिपेसिलार कोण आहेत, हे तुम्ही ऐकले आहे. व्होट जिहादसाठी हे उलेमानचे तळवे चाटत आहेत. दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ, असे ते सांगत आहेत. जर या ठिकाणी व्होट जिहाद होणार असेल तर आता मतांचे धर्मयुद्ध आपल्याला देखील लढावे लागेल, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

    ही निवडणूक तुमची, तुमच्या पुढील पिढ्यांची

    आता एक राहिलो तरच सेफ राहू असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी एक है तो सेफ है… नारा दिला. यांचे इरादे केवळ महाराष्ट्र नाही तर दिल्ली सरकार हलवण्याचे आहेत. हे छोटे इरादे ठेवून याठिकाणी आलेले नाहीत. ते या देशाला अस्थिर करण्याचे काम करत आहेत. त्याच्यात महाविकास आघाडी सामील झालेली आहे. त्यामुळे ही तुमची निवडणूक आहे. तुमच्या पुढील पिढ्यांची निवडणूक आहे. आता जागे झाला नाहीत, तर कधीच जागणार नाहीत. त्यामुळे यांचे नापाक इरादे गाडून टाका, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    फडणवीसांनी ऐकवलेल्या क्लिपमध्ये काय?

    दिल्ली सरकारदेखील जास्त दिवस टिकू शकत नाही. आमचा निशाणा केवळ महाराष्ट्र सरकार नाही तर संपूर्ण देशाची सत्ता आहे. मी काल एका यूट्यूब चॅनलच्या इंटरव्ह्यूतही ही गोष्ट सांगितली की, हा एसा व्होट जिहाद आहे ज्याचे सिपेसालार म्हणजे सेनापती शरद पवार आहेत. अझीम सिपाही म्हणजे महान शिपाई उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले आहेत. आणि आपला निशाणा हा महाराष्ट्र नाही तर दिल्ली आहे, असे त्या क्लिपमध्ये म्हटले आहे.

    Devendra Fadnavis attack; MAVI leaders are licking the palms of Ulema for votes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस