• Download App
    मंत्र्याच्या ओएसडीचा फोन... फार्मा कंपनीचा अधिकारी पोलीसांच्या ताब्यात...फडणवीस, दरेकरांची जागरूकता, अटक नव्हे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची पोलीसांची सारवासारव Devendra Fadnavis at Police Station & DCP Office Mumbai for Remdesivir issue

    मंत्र्याच्या ओएसडीचा फोन… फार्मा कंपनीचा अधिकारी पोलीसांच्या ताब्यात…फडणवीस, दरेकरांची जागरूकता, अटक नव्हे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची पोलीसांची सारवासारव

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – मंत्र्याच्या ओएसडीचा फोन… फार्मा कंपनीचा अधिकारी पोलीसांच्या ताब्यात…देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांची जागरूकता, अटक नव्हे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची पोलीसांची सारवासारव… हे नाट्य काल रात्री घडले. Devendra Fadnavis at Police Station & DCP Office Mumbai for Remdesivir issue

    रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारत खरडपट्टी काढली.

    मात्र, याची कहाणी वेगळीच आहे. ब्रुक फार्मा भाजपला रेमडेसिवीरचा पुरवठा करणार म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पण फडणवीस, दरेकरांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे पुढची हॅरेसन्मेंट टळली.

    दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. फडणवीस आणि दरेकरांच्या म्हणण्यावर तुम्ही इंजेक्शन्सची निर्यात कशी करु शकता, असा जाब त्यांनी विचारला. रात्री १० वाजता पोलीस घरी गेले आणि त्यांना उचलून घेऊन आले. आम्ही रेमडेसिवीर महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना राजकारण सुरू आहे. आम्ही महाराष्ट्राला मदत करण्यासाठी काम करत असून, फक्त आम्ही करत आहोत म्हणून त्रास दिला जात असेल तर योग्य नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

    पोलीस ठाण्यात वाद झाल्यानंतर तेथील अधिकारी आणि भाजपा नेते बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी ब्रुक फार्माविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर अखेर ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि कारवाई केली जाते असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    “महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

    महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे

    या सगळ्या घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी ब्रुक फार्मा कंपनीत जाऊन रेमडेसिवीरसाठी विनंती केली होती. यावेळी त्यांनी परवानगी दिली तर आमचा सगळा साठा महाराष्ट्राला देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मी केंद्रीय मंत्र्यांशी बोलून परवानगीसंदर्भात चर्चा केली. एफडीएकडून सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत.

    Devendra Fadnavis at Police Station & DCP Office Mumbai for Remdesivir issue

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस