विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकारला एका महिलेची एवढी भीती का वाटते, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. तरीदेखील आम्ही घाबरलेलो नाही. हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे सरकारच्या गुंडशाहीला घाबरण्याचे अजिबातच कारण नाही. आम्ही पुर्ण ताकदीनिशी या गुंडशाहीविरोधात लढणार, असे फडणवीस म्हणाले.Devendra Fadnavis asks why the government is so afraid of a woman
फडणवीस म्हणाले, राज्यातील एका अपक्ष महिला खासदाराकडून मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा म्हणण्याची विनंती केली जात असेल तर यात एवढे घाबरण्यासारखे काय आहे. या महिलेला रोखण्यासाठी तिच्या घरावर 200 ते 300 गुंडांना पाठवले जाते. केवळ हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह केला म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. त्यांना अटक केली जाते. अटकेनंतरही त्यांचा छळ केला जातो. राज्यसरकारची ही गुंडशाहीची प्रवृत्ती असून त्याविरोधात आम्ही संघर्ष करणारआहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना तुरुंगात अत्यंत हिन वागणूक दिली जात आहे. सरकारच्या इशाऱ्यानुसारच त्यांना अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत फडणवीस म्हणाले, नवनीत राणा यांना तुरुंगात टॉयलेटसाठीही वेळेवर जाऊ दिले जात नाही. त्यांना पाणी व इतर सुविधाही वेळेवर पुरवल्या जात नाहीत. असे पत्र मला राणांच्या वकिलांनीच दिले. तरुंग प्रशासनाकडून जाणूनबुजून त्यांना अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह असेल तर आमच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा. राज्यात हनुमान चालिसा म्हणायची नाही तर ती काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, पोलिस संरक्षणात भाजप नेत्यांवर हल्ले केले जात आहे. त्यांना जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षाला संपवायचेच असा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.हिंमत असेल तर आमच्या पोलखोल सभांवर हल्ला करून दाखवा. आम्ही घाबरणारे नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis asks why the government is so afraid of a woman
महत्त्वाच्या बातम्या
- नवनीत राणांशी तुरुंगात हीन वागणूक; राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश
- चंद्रकांत दादांनी उडवली भोंगे सर्वपक्षीय बैठकीची खिल्ली; नुसती चहा – बिस्किटे, निर्णय नाही!!
- पिस्टल विक्री करणाऱ्या आराेपींकडून ११ पिस्टल जप्त
- किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक