वृत्तसंस्था
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली.Devendra Fadnavis announces high level inquiry in Kirit Somayya video case
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून विधानपरिषदेतही गोंधळ झाला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही.
महिलेची ओळख सांगता येत नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही. त्यामुळे ती जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. स्वतः सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. याची अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांना पत्र
देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”
“मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे दावे केले जात आहेत”
“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती.
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही. अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी.
“सर्व व्हिडीओंची सत्यता तपासून चौकशी करावी”
“ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.
Devendra Fadnavis announces high level inquiry in Kirit Somayya video case
महत्वाच्या बातम्या
- विरोधी ऐक्यासाठी जमले होते 26 पक्ष, आज NDAच्या बैठकीला 38 पक्षांचा सहभाग
- संशयाचे पडळ घेऊन शरद पवार आज बंगलोरच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत!!
- एसबीआयचा अहवाल- महापुरामुळे देशात तब्बल 15 हजार कोटींचे नुकसान, 92 टक्के जनता विमाच काढत नाही
- दिल्लीतील अधिकारांच्या लढाईवर घटनापीठ करणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा नायब राज्यपाल- मुख्यमंत्र्यांना मिळून काम करण्याचा सल्ला