• Download App
    Devendra fadnavis and sunetra Pawar keeping mum over NCP unification राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    Devendra fadnavis

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यक्तीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प आणि देवेंद्र फडणवीस विदर्भ – तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!, हेच राजकीय चित्र आज शनिवारी समोर आले.Devendra fadnavis and sunetra Pawar keeping mum over NCP unification

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. अजित पवारांची शेवटची इच्छा या शब्दांचे भांडवल करून एकमेकांशी भांडले. रोहित पवार, जयंत पाटील उत्तम जानकर यां नेत्यांनी शरद पवारांची बाजू उचलून धरली, म्हणजेच विलीनीकरणाची बाजू उचलून धरली. 9 तारखे नंतर बोलू. 12 तारखेला पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करू, अशी दमबाजी रोहित पवारांनी केली. जयंत पाटलांनी सुरुवातीला दोन-तीन दिवस विलीनीकरणावर भाष्य केले, पण नंतर सगळा रागरंग पाहून गप्प बसणेच पसंत केले. सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले. विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात या सवालाचे उत्तर त्यांनी द्यावे मग त्यावर आम्ही भाष्य करू, असे तटकरे यांनी रोहित पवारांना ठणकावले.



    – शरद पवारांच्या बारामतीत बैठका

    याच दरम्यान शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठान मध्ये आणि सहयोग सोसायटीमध्ये जाऊन पवार कुटुंबाच्या किमान चार बैठका घेतल्या. पवारांनीच दोन पत्रकार परिषदा घेतल्या. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला पवारांच्या राष्ट्रवादीतून मोठे हवा दिली गेली पण याच दरम्यान सुप्रिया सुळे मात्र बारामतीतून दूर जाऊन दिल्लीत बसल्या होत्या.

    – सुनेत्रा पवार अजून गप्प

    बारामतीतल्या बैठकांना सुनेत्रा पवार हजर राहिल्या तरी त्या एका शब्दाने जाहीरपणे काहीही बोलल्या नाहीत. त्यांनी आज जिल्हा परिषद निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी काटेवाडीतल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले, पण राजकारणावर अथवा कुटुंबातल्या बाबींवर कुठलेही जाहीर भाष्य केले नाही. दहा फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्या बैठकीला उपमुख्यमंत्री या नात्याने सुनेत्रा पवार हजर राहणार आहेत.

    – शिंदे सेनेतून वाग्बाण

    शरद पवारांच्या गटाने पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठा राजकीय गदारोळ चालवला असताना मध्येच एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी वाग्बाण सोडले. संजय शिरसाट, उदय सामंत, रामदास कदम हे त्यात आघाडीवर राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फटकारल्यानंतर ते गप्प बसले.

    – फडणवीस नागपूर मधल्या कार्यक्रमात मग्न

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या काळात नागपूरमध्ये अडवांटेज विदर्भ कार्यक्रमात मग्न राहिले तिथे 22 देशांच्या राजदूतांचे आणि वाणिज्य दूतांचे त्यांनी स्वागत केले. वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर गुंतवणुकीचे करार केले.

    – तेलंगणात प्रचार

    त्यानंतर देवेंद्र फडणवीस तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी निघून गेले. देवेंद्र फडणवीस यांनी आज शिरपूर कागज नगर नगरपालिका आणि मंचेरियल महापालिका या निवडणुकांच्या प्रचारात सहभाग घेतला, यावेळी त्यांच्याबरोबर राज्याचे मंत्री आशिष शेलार होते. आशिष शेलार यांच्याकडे तेलंगण मधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रभारी पद आहे. त्यामुळे ते तिथे सर्व वेळ प्रचारात मग्न आहेत. त्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी निमंत्रण दिले होते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगण मध्ये जाऊन भाजपचा प्रचार केला.

    – निर्णय घेणारे दोघे गदारोळापासून अलिप्त

    एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मोठा गदारोळ सुरू असताना त्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेणारे दोन नेते सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस त्या गदारोळापासून अलिप्त राहिले. याचा अर्थ त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्याला फारसे महत्त्व दिले नसल्याचे स्पष्ट झाले.

    Devendra fadnavis and sunetra Pawar keeping mum over NCP unification

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती

    ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा, अजितदादा गेल्यानंतर भाजपच्या हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!