विशेष प्रतिनिधी
मुंबई : कृष्णा मूजमुले पाटील, राहणार जालना यांचा मुलगा श्रीहरी कृष्णा मूजमुले पाटील वय वर्षे 13 या मुलाचे शाळेत जाताना सकाळी 8.00 च्या सुमारास रस्त्यातून अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर तब्बल 2.00 तासांनी मुलाच्या वडिलांना कीडनॅपरचा फोन करून मुलाच्या सुटकेच्या बदल्यात तब्बल 5 कोटींची खंडणी मागितली. Devendra fadnavis and jalna police saved life of 11 years boy from kidnappers
या फोनमुळे मुलाचे कुटुंब घाबरले होते पण मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांना फोनवर कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून ओमप्रकाश यांनी ही बाब राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली.
देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यासंदर्भात ऍक्शन घेत जालन्याचे SP यांना यासंदर्भात सूचना दिल्या आणि अपडेट्स देण्याच्या सूचना केल्या. स्वतः गृहमंत्री लक्ष घातल्याने पोलीस देखील ऍक्शन मोडवर आले. जालना SP यांनी Add. SP च्या नेतृत्वात तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांची पथके तयार करण्यात आली. घटनेला 2.00 तास उलटून झाल्याने अपहरणकर्ते जास्त लांब गेले नसतील, या दिशेने तपास सुरू झाला. रस्त्यातील CCTV फुटेज खंगाळत पोलिसांनी अपहरणकर्त्याचे आयडेंटीफिकेशन करण्यास यश मिळाले. अपहरण झाल्या 5.00 तासात पोलिसांनी आरोपी आयडेंटीफाय केले. इकडे अपहरण कर्ते मुलाच्या वडिलांना फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागू लागले. 5 कोटी नाही दिले तर मुलाला एड्सचा स्टेरॉइड देऊन जीवे मारू अशी धमकी देऊ लागले.
गरीब मराठा समाजातून छोटा आयुर्वेदीक मेडिकलचा व्यवसाय करणाऱ्या मुलाच्या वडीलाने अपहरणकर्ते यांना विनवणी करू लागले, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत 5 लाख रुपये पर्यंत देतो, पण शेवटी 10 लाख रुपये देण्याचे ठरवलं गेले. पोलिसांनी सगळी सूत्रे हातात घेतल्याने आरोपींचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात झाली. पण, मुलगा सुखरूप राहिला पाहिजे या दिशेने पोलीस काम करत होते.
10 लाख रुपये देण्याचं ठरलं असल्याने पैशाचा व्यवस्था करून मुलाच्या वडीलांना थोड्यावेळापूर्वी (आज रात्री ) साडे 8.00 वाजता मंठा रोड डी- मार्ट जालना या ठिकाणी येण्यास सांगितल. पोलिसांनी रचलेल्या सापळ्या प्रमाणे मुलाचे वडील 10 लाख रूपये घेऊन निघाले.
त्या ठिकाणी गेल्यावर अपहरणकर्त्यांना 10 लाख रुपये देऊन मुलाला ताब्यात घेतलं. पैसे घेऊन तिथून पळ काढण्या आधीच पोलिसांनी झडप घातली. अरबाज शेख, राहुल गेरूवाल आणि वर्मा नावाच्या तीन अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि मुलाची सुटका केली.
योगायोग असा ही एक आहे…
अपहरण झालेल्या मुलाची बहीण, कृष्णा मूजमुले पाटील यांची कन्या धनश्री कृष्णा मूजमुले पाटील ह्या मुलीचे 7 वर्षा आधी ह्रदय प्रत्यारोपण करण्यात आले. त्यावेळी सुद्धा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कृष्णा मूजमुळे पाटील कुटुंबीयांच्या मदतीला देव बनवून धावून आले. मुलीच्या सर्व ऑपरेशन खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून करण्यात आला होता.
मुलगी धनश्री आणि मुलगा श्रीहरी या दोन्ही मुलांचा पुनर्जन्म झाला.. माझं, मुलांच्या वडिलांशी काही वेळापूर्वी बोलण त्यावेळी त्यांनी सांगितलं की, देवेंद्रजी मुळे माझ्या दोन्ही मुलांना पुनर्जन्म मिळालं आहे, अशी कृतज्ञता मुजमुले पाटील कुटुंबांनी व्यक्त केली.
Devendra fadnavis and jalna police saved life of 11 years boy from kidnappers
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे + पवारांच्या संभाव्य खेळी ओळखून दिल्ली + महाराष्ट्रात काँग्रेसची सावध पण दमदार पावले!!
- राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील, I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत निर्णय
- केजरीवालांना मोठा झटका, उच्च न्यायालयाने जामीन देण्यास दिला नकार!
- भाजपला डॅमेज करून महायुतीतून खसकण्याचा अजितदादांचा डाव??; स्वबळावर लढण्याचे मिटकरींचे विधान!!