विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत कोण पडले कुठे कमी??, गणित सांगत फडणवीस यांनी केली पुढल्या पेरणीची आखणी!! Devendra fadnavis analys BJP performance in loksabha elections and asserts future plans for assembly elections
लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित कामगिरीनंतर मला सरकारमधून मोकळं करा म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पण त्यापूर्वी फडणवीस दिल्लीमध्ये अमित शहांना भेटून आले त्यांनी नरेंद्र मोदींच्या संसदीय नेते पदाच्या बैठकीत भाग घेतला मुख्य मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडच्या बैठकीत सहभाग घेतला दिल्लीतून “असे” “बळ” घेऊन आल्यानंतर फडणवीस यांनी काही निवडक आमदार आणि नेत्यांशी संवाद साधला.
यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो अशा शब्दांत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं आहे. आपण तीन पक्षांसाठी तयारी केली होती. पण चौथ्या पक्षासाठी तयारीच केली नाही सांगत ते आपल्या अपयशाचं मुख्य कारण असल्याचं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
नव्याने पेरणी करण्याची वेळ आली आहे. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो. मला मोकळं करा असं सांगितलं तेव्हा ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा नव्हे तर लढणारा व्यक्ती आहे. चारही बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे कोणाला मी निराश झालो असं वाटत असेल तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात काही रणनीती आहे. मी अमित शाह यांना भेटून डोक्यात काय आहे हे सांगितलं. त्यांचीही भूमिका तुमच्यापेक्षा फार काही वेगळी नव्हती. त्यांनी सध्या आहे तसं काम सुरु राहू दे, आपण नंतर महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करु असं सांगितलं. पण कोणत्याही स्थितीत मी शांत बसणार नाही.
देशात मोदींना जनतेने समर्थन दिलं, तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं. त्याचवेळी ओडिशात आपलं सरकार येणं. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेशात सरकार येणं हे स्पष्टपणे काय सांगत आहेत हे पाहिलं पाहिजे. काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात. तीन निवडणुका मिळून त्यांना जितक्या जागा मिळाल्या त्या एकाच निवडणुकीत एनडीएला मिळाल्या. इंडिया आघाडीला मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपाला मिळाल्या.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 43.9 % आणि महायुतीला 43.6 % मतेशआहेत. फक्त 0.3 % इतकं अंतर आहे. पण त्याचा परिमाण तिकडे 31 जागा आणि इकडे 17 जागा आहेत. महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख, तर महायुतीला 2 कोटी 48 लाख मतं मिळाली आहेत. 2 लाख मतं जास्त मिळाली आहेत. मुंबईत त्यांना 24 लाख आणि आपल्याला 26 लाख मतं मिळाली. पण त्यांना 4 आणि आपल्याला 2 जागा मिळाल्या आहेत. आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो. चौथा पक्ष “खोटा नॅरेटिव्ह” होता. या 3 पक्षांना रोखलं तर यशस्वी होईल असं आपल्य़ाला वाटलं होतं.
पण चौथ्या पक्षासाठी म्हणजे खोट्या नॅरेटिव्हला खणखणीत प्रत्युत्तर देण्याची आपण तयारीच केली नाही. त्यामुळे आपण महाविकास आघाडीला रोखू शकलो नाही. मोदी सरकार 400 पार गेले तर संविधान बदलणार हा खोटा नॅरेटिव्ह तयार करून विरोधकांनी तो विषय खालपर्यंत नेला. पण आपण तो नॅरेटिव्ह नीट खोडून काढू शकलो नाही. ते जे खोटं बोलत होते ते सामान्य माणसाला खरं वाटलं होतं पण आता ती मर्यादा देखील संपली आहे.
– भाजपला 76 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी आहे. महायुतीला 133 मतदार संघांमध्ये आघाडी आहे. ती आघाडी वाढवण्याचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे म्हणजे 3 % टक्के मते आपल्याला वाढवायची आहेत.