अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईमुळे सरकारने क्रौर्याच्या सर्व मयार्दा ओलांडल्या अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गुन्हेगारांनाही वागणूक दिली जात नाही, तशी वागणूक सरकारने राणा दांपत्याला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला. Devendra Fadnavis alleges that the government exceeded all limits of cruelty in taking action against the Rana couple
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईमुळे सरकारने क्रौर्याच्या सर्व मयार्दा ओलांडल्या अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गुन्हेगारांनाही वागणूक दिली जात नाही, तशी वागणूक सरकारने राणा दांपत्याला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणार असल्याची घोषणा राणा दांम्पत्यांनी केली होती. त्यानंतर राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळाले .या सर्व घडामोडींनंतर राणा दांपत्याला बारा दिवस तुरुंगात राहावे लागले. यामध्ये नवनीत राणा यांची प्रकृती खालावली होती. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्यात हनुमान चालीसा म्हणण्यावरुन राजकारण चांगलेच तापले असताना राणा दांपत्याने मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांना चकमा देत राणा दांपत्य मुंबईतही पोहोचले. मात्र, त्याचवेळी शिवसैनिकांची गर्दी मातोश्रीबाहेर झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत राणा दांपत्याला ताब्यात घेतले. आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्यांना बारा दिवस तुरुंगात राहावे लागले
Devendra Fadnavis alleges that the government exceeded all limits of cruelty in taking action against the Rana couple
महत्वाच्या बातम्या
- “असानी”चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; 10 मे रात्री आंध्र – ओडिशा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता!!
- कोरोनाकाळात सर्वसामान्य गुंतवणूकदारांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले कौतुक
- राजद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर हा पुनर्विचाराचा आधार ठरत नाही, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- पुतीन सरकारची दंडेली, युक्रेन युध्दाबाबत टीका केली म्हणून रशियातील पत्रकाराला एक लाख रुबल दंड