• Download App
    मुंबईच्या कोरोना मॉडेलमागे काळंबेरं, आकडेवारी उजेडात येऊ दिली जात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप|Devendra Fadnavis alleges that statistics are not allowed to come to light behind Mumbai's Corona model

    मुंबईच्या कोरोना मॉडेलमागे काळंबेरं, आकडेवारी उजेडात येऊ दिली जात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    मुंबईतील कोरोना मॉडेलचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. मात्र, यामागे काहीतरी काळंबेरं असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर कोरोनाबाधित आणि मृत्यूंची आकडेवारी लपवित असल्याचा संशय व्यक्त केला आहे.Devendra Fadnavis alleges that statistics are not allowed to come to light behind Mumbai’s Corona model


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतील कोरोना मॉडेलचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. मात्र, यामागे काहीतरी काळंबेरं असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर कोरोनाबाधित आणि मृत्यूंची आकडेवारी लपवित असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

    मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रमाणा तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.



    देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे की, कोविडसंदभार्तील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे.

    या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रूग्ण यांचा आहे.

    केवळ असेच मृत्यू हे अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू या रकान्यात नोंदवायचे आहेत. मुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.

    रॅपीड अँटीजेन कमी केल्या तर संसर्ग दर वाढतो आणि त्या वाढविल्या तर संसगार्चे प्रमाण कमी होते. यातून हे अतिशय स्पष्ट होते की, संसर्ग कमी होतोय हे दाखविण्यासाठी चाचण्या सुद्धा नियंत्रित केल्या जात आहेत. कमी चाचण्यांमुळे संसर्गाचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय मृत्यूदरही वाढतो.

    परंतू अशापद्धतीने बनवाबनवी केली जात असल्याने करोनाचे वास्तविक चित्र जनतेपुढे येत नाही. याशिवाय, अन्य कारणामुळे होणारे मृत्यू असे दाखवून त्यांचे कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार न केल्यास त्यातून अकल्पित अशा असंख्य संकटांना वेगळेच तोंड द्यावे लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

    मुंबईतील प्रशासन आणि अधिकारी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी करीत असलेले प्रयत्न मला अजीबात कमी लेखायचे नाहीत असे सांगून फडणवीस म्हणाले, मुंबईतील करोना संसगार्चा आलेख स्थिरावतोय. ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे.

    परंतू, आयआयटी कानपूरचे प्रो. मणिंदर अग्रवाल यांनी सांख्यिकी अभ्यासाच्या आधारावर यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मुंबईत कोरोना संसगार्चे शिखर (पिकिंग) उर्वरित देशाच्या तुलनेत आधीच म्हणजे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातच गाठले व त्याच मॉडेलप्रमाणे आता तो स्थिरावताना दिसतो आहे

    आणि यानंतर तो कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबईमध्ये घडले त्याप्रमाणेच पुणे तथा नागपूर याही ठिकाणी प्लाटुईंगची स्थिती दिसून येते आहे. आता आपण तिसºया ल्लाटेसाठी सज्ज होतोय्, तर अशावेळी पीआर संस्थांमार्फत जे चित्र जनतेपुढे निर्माण केले जातेय,

    ते पूर्णत: दिशाभूल करणारे आणि करोनाविरोधातील राज्य सरकारच्या संघषार्ला कमकुवत करणारे आहे. ही बनवाबनवी आणि पीआर यंत्रणांमार्फत समाजाची, राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल तत्काळ बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    Devendra Fadnavis alleges that statistics are not allowed to come to light behind Mumbai’s Corona model

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!