• Download App
    टीईटी परीक्षा घोटाळ्याची सीबीआयतर्फे चौकशी केल्यास मंत्रालयापर्यंत धागेदोरे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप|Devendra Fadnavis alleges that if TET exam scam is being investigated by CBI ministrys invollvment will come on surface

    टीईटी परीक्षा घोटाळ्याची सीबीआयतर्फे चौकशी केल्यास मंत्रालयापर्यंत धागेदोरे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : टीईटी घोटाळ्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून ( सीबीआय) चौकशी केल्यानंतर या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.Devendra Fadnavis alleges that if TET exam scam is being investigated by CBI ministrys invollvment will come on surface

    फडणवीस म्हणाले की, ‘सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील.’ अशी मागणी फडणवीसांनी केली असून, त्यांनी थेट सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरात घबाड सापडल्यानंतर फडणवीसांनी पोस्ट शेअर केली आहे त्यात ते म्हणाले आहे



    की, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत.

    आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील,

    अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा. अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

    Devendra Fadnavis alleges that if TET exam scam is being investigated by CBI ministrys invollvment will come on surface

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला