खुल्या बाजारात रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले टाकून राज्यांना मदत केली आहे. राज्याला संपूर्ण कोटा हा तकार्धारित असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रालाच झाला आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आता तरी राजकारण बंद करून केवळ दोषारोप करण्याचे काम बंद केले पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.Devendra Fadnavis advises Thackeray government to stop politics and stop accusations
विशेष प्रतिनिधी
मुंबई : खुल्या बाजारात रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले टाकून राज्यांना मदत केली आहे. राज्याला संपूर्ण कोटा हा तकार्धारित असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रा लाच झाला आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आता तरी राजकारण बंद करून केवळ दोषारोप करण्याचे काम बंद केले पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटसोबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडओत दरेकर म्हणतात, ह्वराज्य सरकारने रेडमडेसिवीर संदर्भात पुन्हा एकदा केंद्राला दोष देण्याचा दुदैर्वी प्रयत्न केला आहे.
आपलं अपयश झाकण्यासाठी व महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न केला गेलेला आहे. मात्र वस्तुस्थिती आज मी सांगणार आहे. मुळात किती तुटवडा आहे? किती मागणी आहे? याबाबतच या सरकारमध्ये एकवाक्यता नाही.
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ३६ हजार रेमडेसिवीरची मागणी असल्याचे सांगत असताना, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे ५० हजार रेमडेसिवीर हवे असल्याचे म्हणत आहेत. हे कमी म्हणून की काय शिवसेना नेते संजय राऊत ८० हजार रेमडेसिवीरची आवश्यकता असल्याचं म्हणत आहेत.
तर, ज्याचं खातं आहे ते अन्न व औषध प्रशासन मंत्री काही बोलतच नाही. म्हणजे आकडेवारीत देखील यांची एकवाक्यता नाही. मला वाटतं जो दहा हजारांचा तुटवडा आहे, महाराष्ट्राला देशात सगळ्यात जास्त रेमडेसिवीर केंद्रकाडून देण्यात आलेलं आहे.
हे सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारवर टीका करण्याची चढाओढ राज्य सरकारच्या मंत्र्यामध्ये लागल्याचं दिसत आहे असा देखील आरोप दरेकर यांनी केला आहे.
Devendra Fadnavis advises Thackeray government to stop politics and stop accusations
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदाची बातमी : १८ वर्षांवरील सर्वांना २८ एप्रिलपासून रजिस्ट्रेशनची मुभा, अशी करा नोंदणी
- Pfizer Vaccine : फायजर कंपनीची नफा न कमावता भारताला कोरोनावरील लस देण्याची घोषणा
- पंतप्रधान मोदींनी रद्द केल्या उद्या होणाऱ्या बंगालमधील सर्व सभा, कोरोना परिस्थितीवर घेणार उच्चस्तरीय बैठक
- अनास्थेचा परिणाम : जानेवारीतच केंद्राने कोरोना लाटेचा राज्यांना दिला होता इशारा, दुर्लक्षामुळे महामारीचा झाला उद्रेक
- ‘जिथे कमी तिथे आम्ही’ : ऑक्सिजनसाठी कॉर्पोरेट- सरकारी कंपन्यांचा पुढाकार, टाटा-रिलायन्ससह अनेक कंपन्या मैदानात