मराठवाड्याला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पाणी दिले जात आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आढावा बैठक घेतली. मराठवाड्याला त्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी शासन संवेदनशील आहे. सिंचनासाठी आवश्यक मान्यता आणि प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना यावेळी दिल्या.
मराठवाड्यातील अनेक पिढ्यांनी दुष्काळ पाहिला असून, पुढच्या पिढ्यांना दुष्काळाच्या वेदना सहन कराव्या लागू नयेत, यासाठी राज्य सरकार अनेक उपाय योजना राबवत आहे. त्यानुसार, मराठवाड्यात अनेक सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्यालाच दिले जाणार असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. याबाबत निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. अशी माहिती दिली.
राज्यात सिंचन प्रकल्पांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ज्या भागाला जेवढे पाणी मंजूर आहे, त्या भागाला तितके पाणी दिले जाणार आहे. मराठवाड्याला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पाणी दिले जात आहे.
यावेळी बैठकीस मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Preeti Sudan : प्रीती सूदन UPSCच्या नव्या अध्यक्ष; मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती, संरक्षण मंत्रालयासह अनेक खात्यांचा 37 वर्षांचा
- Ajit Pawar vs Sharad pawar : अजितदादांचे मंत्री, आमदारांविरोधात पवारांचा “मोठा प्लॅन”; पण तरुणांना उमेदवारी देण्याशिवाय दुसरा पर्याय काय??
- Ramdas Athawale : रामदास आठवलेंनी दिली अधीर रंजन चौधरींना खुली ऑफर, म्हणाले…
- Ismail Haniyeh : हमास प्रमुख इस्माईल हनियाच्या हत्येबाबत इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे पहिली प्रतिक्रिया आली समोर!