• Download App
    Maratha Reservation Issue : राज्यात पांढऱ्या पायाचे सरकार आल्याने मराठा आरक्षण झाले रद्द : ठाकरे- पवार सरकारवर सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका।Devendra Fadanvis Gives Maratha Reservation. But State Goverment led by Thakre -Pawar lost the battle in court : Sadabhau Khot

    Maratha Reservation Issue : राज्यात पांढऱ्या पायाचे सरकार आल्याने मराठा आरक्षण झाले रद्द : ठाकरे- पवार सरकारवर सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

    वृत्तसंस्था

    कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले. पण हे करंटे, पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि आरक्षण रद्द झालं, अशा शब्दात माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. Devendra Fadanvis Gives Maratha Reservation. But State Goverment led by Thakre -Pawar lost the battle in court : Sadabhau Khot

    मराठा आरक्षण आणि अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या भूमिकेविषयी खोत यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला.



    राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा लढा लढताना विरोधी पक्ष, वकिलांची मते घेतली नाही, योग्य बाजू मांडली नाही, किंवा गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावेही जोडले नाहीत. त्यामुळं फडणवीस यांनी दिलेलं मराठा आरक्षण हे करंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर आरक्षण रद्द झाले, असं खोत म्हणाले. केंद्राप्रमाणं राज्यसरकारनंहीन्यायालयात याचिका का दाखल केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

    अशोक चव्हाणांवर हल्लाबोल

    अशोक चव्हाणांचा आदर्श घेण्यासारखा आहे, असा टोला त्यांनी मारला. चव्हाण वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत असून त्यांना आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष करू नये, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री होता आणि आता दोन नंबर, तीन नंबर नाही तर भीक मागून खातं मिळवावं लागतं. कोतवालसुद्धा तुमच्या पेक्षा स्वाभिमानी असतो. चव्हाणांमुळे मुख्यमंत्र्यांचा कोतवाल झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं असंही खोत म्हणाले.

    Devendra Fadanvis Gives Maratha Reservation. But State Goverment led by Thakre -Pawar lost the battle in court : Sadabhau Khot

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!