• Download App
    होय, रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान!!; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर Devendra Fadanavis targets Uddhav Thackeray over his remarks rickshawala eknath shinde

    होय, रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान!!; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर

    प्रतिनिधी

    मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना रिक्षावाल्याच्या रिक्षेला ब्रेक नव्हता, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली या देशात सर्वसामान्य माणूस राजा आहे आणि तोच देशाची सेवा करतोय, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधले आहे. Devendra Fadanavis targets Uddhav Thackeray over his remarks rickshawala eknath shinde

    काँग्रेस पक्षाने देखील पंतप्रधान मोदींना चायवाला म्हणून हिणवले. पण मोदींनी काँग्रेसला असे पाणी पाजले त्यामुळे काँग्रेसची अवस्था आज काय आहे, हे आपण बघतोय आणि जर आम्ही रिक्षावाले, पान टपरीवाले, चहा टपरीवाले, रस्त्यावरचे विक्रेते असलो तरी त्याचा आम्हाला अभिमान आहे. या देशात स्वाभिमानाने जो जगतो तोच खरा राजा असतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

    सामान्य माणूसच राजा

    तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला येतात आणि ज्यांना असे वाटते की राज्य करणं हा आमचाच अधिकार आहे, त्यांनी समजून घ्यावे की पंतप्रधान मोदींच्या या लाटेत सामान्य माणूसच राजा होणार आहे आणि तोच देशाची सेवा करणार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

    उद्धव ठाकरेंची टीका

    विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव यशस्वी झाल्यावर भाषण केले. त्यांनी केलेल्या मनमोकळ्या भाषणामुळे विरोधकांनाही हसू आवरता आले नाही. पण याच भाषणावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना भवनात बोलताना रिक्षावाल्याची रिक्षा अगदी सुसाट सुटली होती. रिक्षाला ब्रेक नव्हता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या टीकेला फडणवीस यांनी नागपुरातून उत्तर दिले.

    Devendra Fadanavis targets Uddhav Thackeray over his remarks rickshawala eknath shinde

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!