प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण अंमलात आणण्यासाठी ठाकरे – पवार सरकारकडून अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांनी आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेची माहिती घेऊन याविषयाची कायदेशीर बाजू समजून घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राजभवनात अडकणार, असे महाविकास आघाडी सरकारचे नेतेच पसरवत आहेत. प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे नेते हा अध्यादेश दाखवून ओबीसी समाजाची फसवणूक करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. Devendra Fadanavis targets Thackeray – Pawar government over OBC reservation
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय त्याबाबतचा अध्यादेश न्यायालयात टिकू शकत नाही, असे राज्य सरकारच्या कायदा व न्यायव्यवस्था विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अशावेळी अध्यादेश काढण्यासाठी महाधिवक्त्यांचे मत घ्यावे लागते. मात्र अशा कुठल्याही प्रकारचा सल्ला न घेता राज्य सरकारने अध्यादेशाची फाईल थेट राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवली. त्यावर राज्यपालांनी कायदा व न्याय विभागाचा मुद्दा अधोरेखित करत त्यावर आपली भूमिका मांडण्याची सूचना राज्य सरकारला केली. जी ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवण्याच्या दृष्टीने हिताची आहे.
ओबीसींच्या फसवणुकीचा डाव
पण याबाबत कुठलीही भूमिका न घेता महाविकास आघाडी सरकाचे नेते ज्यापद्धतीने वक्तव्य करत आहेत, त्यावरुन ओबीसी समाजाची फसवणूक करण्याचा डाव त्यांच्या मनात आहे, त्यांना केवळ समजाला दाखवणयासाठी हा अध्यादेश काढायचा आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
तर आम्हीही राज्यपालांना विनंती करू
त्यामुळे फसवणुकीचा अध्यादेश न काढता तो टिकायला हवा यासाठी राज्य सरकारने आपली भूमिका घ्यावी. त्यानंतर या अध्यादेशासाठी आम्ही देखील त्यांच्यासोबत राज्यपालांना अध्यादेश पारित करण्यासाठी विनंती करू, असे फडणवीस म्हणाले.
Devendra Fadanavis targets Thackeray – Pawar government over OBC reservation
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात अत्याचार थांबेनात : पुण्यात विवाहितेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, एका आरोपीला अटक, इतरांचा शोध सुरू
- आसाम सरकार आणि ULFA मध्ये चर्चा सुरू, केंद्रही शांतता चर्चेचा होणार सहभागी, मुख्यमंत्री सरमा यांचे प्रतिपादन
- Evergrande crisis : एका चिनी कंपनीमुळे जगभरातील 500 गर्भश्रीमंतांचे 135 बिलियन डॉलर्सचे नुकसान, भारताला का होणार फायदा?, वाचा सविस्तर…
- बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये फक्त 107 दिवसांत 1 कोटी गुंतवणूकदारांची भर, 8 कोटींचा टप्पा पार, कोरोना काळात शेअर बाजाराला पसंती
- ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये शक्तिशाली भूकंप, रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रता, अनेक इमारतींचे नुकसान, पाहा व्हिडिओ