प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रातील ठाकरे – शिंदे सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागितला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्याच मुद्द्याला दुजोरा दिला आहे. या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या विमानतळावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी शरद पवारांचे नैतिकता बाहेर काढली आहे. Devendra Fadanavis targets sharad Pawar over political morality
शरद पवारांनी भाजपला नैतिकता शिकवणे हे जरा जास्तच झाले. मग फार मागच्या इतिहासात जावे लागेल. वसंतदारांचे सरकार कसे पाडले?, बऱ्याच गोष्टी काढाव्या लागतील. पण पवार साहेब जेष्ठ नेते आहेत. ते काही बोलत राहतात. फार लक्ष देऊ नये, असा खोचक टोला फडणवीस यांनी पवारांना हाणला आहे.
उद्धव ठाकरेंना देखील नैतिकतेच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार काय? असा सवाल करून फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचाही नजीकचा इतिहास बाहेर काढला. ज्या उद्धव ठाकरेंनी मोदींचे फोटो लावून खासदार – आमदार निवडून आणले, त्यानंतर त्यांनी युती तोडली. स्वतःचा पक्ष फुटू दिला आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीला जाऊन मिळाले. ते कोणत्या नाकाने नैतिकता बोलून राहिलेत?, असा खोचक सवाल फडणवीसांनी केला.
Devendra Fadanavis targets sharad Pawar over political morality
महत्वाच्या बातम्या
- अदानी-हिंडेनबर्ग वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तज्ज्ञांच्या समितीने न्यायालयात अहवाल सादर केला
- द फोकस एक्सप्लेनर : दिल्ली सरकारच्या कामकाजात नायब राज्यपालांना आता कोणते अधिकार? सर्वोच्च निकालानंतर किती बदल होईल? वाचा सविस्तर
- एलन मस्क सोडणार ट्विटरचे सीईओ पद, 6 आठवड्यांत महिला सीईओ करणार जॉइन
- पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, 4400 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी