• Download App
    देशात काँग्रेसला बाजूला ठेवायला निघालेल्यांकडे महाराष्ट्रात काँग्रेस शिवाय पर्याय आहे का??; फडणवीसांचा पवारांना टोला |Devendra Fadanavis targets mamata and Pawar over UPA issue

    देशात काँग्रेसला बाजूला ठेवायला निघालेल्यांकडे महाराष्ट्रात काँग्रेस शिवाय पर्याय आहे का??; फडणवीसांचा पवारांना टोला

    प्रतिनिधी 

    मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस प्रणित यूपीएचे राजकीय अस्तित्व नाकारल्यानंतर त्याचे पडसाद देशभरातील राजकीय वर्तुळात उमटले आहेत. ममता बॅनर्जी यांना शरद पवार यांनी साथ दिल्यामुळे महाराष्ट्रात तर त्याचे पडसाद अधिकच उमटले आहेत.Devendra Fadanavis targets mamata and Pawar over UPA issue

    काँग्रेसला वगळून सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या ममता आणि पवार यांच्या प्रयत्नांवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील टोला लगावून घेतला आहे. ज्यांना देशाच्या राजकारणातून काँग्रेसला बाजूला काढायचे आहे,



    त्यांना महाराष्ट्रात सरकार चालवण्यासाठी काँग्रेस शिवाय पर्याय तरी आहे का…??, असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला आहे. ममता बॅनर्जी या थेट बोलतात पण पवार बिटवीन द लाईन्स बोलतात, असा शेराही फडणवीसांनी मारला आहे.

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार चालविताना काँग्रेस शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना पर्यायच नाही, हेच फडणवीस यांनी अधोरेखित करून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला टोचले आहे.

    Devendra Fadanavis targets mamata and Pawar over UPA issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !