प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेनेला ३४ % निधी आणि भाजपला ६६ % निधी दिल्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना जबरदस्त टोला हाणला. तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी अशा शब्दांमध्ये फडणवीसंनी अजितदादांनीच केलेल्या निधी वाटप असल्यास भेदभावावर भेदक काव्यातून निशाणा साधला. Devendra Fadanavis targets ajit Pawar over Budget allocations of fund during MVA government
अजितदादांनी पंचामृत या शब्दावर श्लेष करत महाविकास आघाडीला पळीभर पंचामृत, शिंदे गटाला प्रसाद आणि भाजपला महाप्रसाद असे सूचक उद्गार काढत फडणवीसांना डिवचले होते. आज त्याचे सगळे उट्टे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरल्या चर्चेला उत्तर देताना काढले.
यावेळी त्यांनी हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनेचे दिवंगत पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालल्यावर नेमका काय परिणाम होतो, हे रोकड आकडेवारी देऊन सिद्ध केले.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजितदादा मला तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडतो. तुम्ही सांगितले, अर्थसंकल्पात शिवसेनेला ३४ % निधी आणि भाजपला ६६% निधी. पण सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालल्यावर काय परिणाम होतो? पाहा. २०२०-२१च्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला २ लाख ४८ हजार ३८८ कोटी निधी, काँग्रेसला १ लाख २१ हजार १४ कोटी निधी आणि सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेना, आता तर आम्ही संख्येने मोठे आहोत आणि ते संख्येने कमी आहेत. पण तरीही सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेनेला ६६ हजार कोटी निधी दिला होता. फक्त १५ % दादा, १५ % म्हणजे जेव्हा त्यांचे ५६ होते, तेव्हा १५ % निधी आणि आता आमच्यासोबत ४० आहेत, तरीही ३४ % निधी दिला आहे. त्यामुळे अजितदादा रामदास आठवले यांच्या शब्दात सांगायचे तर तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी!!, शब्दांमध्ये अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी अजितदादांचे वाभाडे काढले.
Devendra Fadanavis targets ajit Pawar over Budget allocations of fund during MVA government
महत्वाच्या बातम्या
- टेन्शन वाढलं! : रशियन विमानांनी पाडले अमेरिकी ड्रोन, अमेरिकेने दिला कठोर इशारा
- Kerala : पलक्कडमध्ये भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांवर जीवघेणा सशस्त्र हल्ला!
- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरील सर्वोच्च सुनावणीचा आज शेवटचा दिवस!
- तिजोरीवर पेन्शनचा भार पडणार तरी किती??; कोटीच्या कोटी उड्डाणांची वाचा टक्केवारी!!