प्रतिनिधी
पुणे : “वज्रमुठीचे प्रमुख यांनी वज्रमुठीचा चेहरा असलेल्यांबद्दल लिहिलेली 10 वाक्य सांगतो!!, ती लिहिली आहेत, राज्यातील जाणकार नेते शरद पवार यांनी “लोक माझे सांगाती”मध्ये…. पूर्ण पुस्तक वाचाच. पण, आज फक्त पृष्ठ क्रमांक 318 आणि 319 ही दोनच पाने मी तुम्हाला सांगतो!!, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे यांचे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत वाभाडे काढले. Devendra Fadanavis readout sharad Pawar’s autobiography and targets Uddhav Thackeray
ते असे :
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हती.
- उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी नसे, जी मुख्यमंत्र्यांकडे असली पाहिजे.
- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पना आम्ही केली नव्हती (या वाक्याचा अर्थ त्यांनी करायला हवी होती)
- त्यांचे कुठे काय घडतंय यावर बारीक लक्ष नसे. उद्या काय होईल, याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी.
- त्यानुसार काय पाऊले उचलायची, हे ठरवायचे राजकीय चातुर्य असायला हवे. त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती.
- त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरीही हे टाळता येणं जमलं नाही.
- महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली.
- संघर्ष न करता त्यांनी माघार घेतली.
- उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते, पण ऑनलाईन. टोपे, अजितदादा, इतर मंत्री प्रत्यक्ष संपर्कात रहायचे.
- उद्धव ठाकरेंचे फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडणारे नव्हते.
हेच आम्ही तुम्हाला सांगत होतो. तेव्हा आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरविले होते…!!
Devendra Fadanavis readout sharad Pawar’s autobiography and targets Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- अखेर कर्नाटकचं नाटक संपलं! सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर शिवकुमार यांची ‘या’ पदावर बोळवण
- द फोकस एक्सप्लेनर : कसा होतो हिंडेनबर्गचा रिपोर्ट, अमाप कमाई करणारे कोण आहेत नॅथन अँडरसन? वाचा सविस्तर
- राज्यात 15 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, पैकी दहा जिल्हे एकट्या विदर्भातील
- CBI Summons : समीर वानखेडेला CBI कडून चौकशीसाठी समन्स, आर्यन खानशी संबंधित प्रकरण