प्रतिनिधी
मुंबई/ नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीला रंग चढत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला, की मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि ओरिजिनल शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे तरी देखील मराठी माध्यमांनी मात्र शिंदे गट आणि मनसे यांच्या युतीच्या बातम्या चालवल्या आहेत. Devendra Fadanavis clarifies BJP and shinde group will contest Mumbai municipal elections, but marathi media claims shinde group and MNS Alliance
अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या बातम्यांना विशेष जोड चढला आहे. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना जमिनीवर आणा. त्यांनी केलेला विश्वासघात त्यांना दाखवून द्या. कानाखाली आवाज काढला तर शारीरिक जखम होते. पण घरासमोर कानाखाली मारली तर जखम खोलवर होते, अशी वक्तव्य केली होती.
अमित शाह यांच्या वक्तव्यांना आज उद्धव ठाकरे यांनी भाजपवाले आम्हाला जमीन दाखवणार असतील, तर आम्ही त्यांना आसमान दाखवू, असे प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप आणि ठाकरे गट यांच्यात अशी राजकीय जुगलबंदी जुंपलेली असताना मराठी माध्यमांनी मात्र त्यांच्या “विशिष्ट सूत्रां”च्या हवाल्याने शिंदे गट आणि मनसे यांच्या युतीच्या बातम्या चालवल्या आहेत. माध्यमांची “सूत्रे” नेमकी कोणती आहेत??, याचा खुलासा बातम्यांमध्ये नाही.
मात्र, या मुद्द्यावर नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्ट खुलासा केला की, मी स्पष्ट सांगतो शिंदे भाजप आणि ओरिजिनल शिवसेना म्हणजे शिंदे गट यांची युती मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवेल आणि महापालिकेवर भगवा फडकवले. पण तुम्ही जी “पतंगबाजी” करता ती मी एन्जॉय करतो. ज्याला जे मनाला येईल ते तो दाखवतो. ज्याला जे मनाला येईल ते इंटरप्रिटेशन करतो. पण मी स्पष्ट सांगतो भाजप आणि ओरिजिनल शिवसेना म्हणजे शिंदे गट हेच एकत्रित निवडणूक लढवून मुंबई महापालिकेवर भगवा फडकवतील.
देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या स्पष्ट शब्दात मुंबईतील राजकीय घडामोडींचा उलगडा केल्यानंतरही माध्यमांनी मात्र आपल्या “विशिष्ट सूत्रां”च्या हवाल्याने शिंदे गट आणि मनसे युतीच्याच बातम्या चालवल्या आहेत. आता आज पर्यंतच्या अनुभवावरून देवेंद्र फडणवीस खरे ठरतात की मराठी माध्यमे खरी ठरतात??, हे येत्या काही दिवसातच समजणार आहे!!
Devendra Fadanavis clarifies BJP and shinde group will contest Mumbai municipal elections, but marathi media claims shinde group and MNS Alliance
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकातील हिजाब वादावर सुनावणी : सुप्रीम कोर्ट म्हणाले- ही धार्मिक बाब नाही, कोणी जीन्स घालून कोर्टात आला तर त्याला नकारच दिला जाईल
- विजय मल्ल्याने फेटाळला सुप्रीम कोर्टाचा आदेश, 318 कोटी भरलेच नाहीत; पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला
- राजपथचे नाव बदलल्याने महुआ मोईत्रांचा संताप, म्हणाल्या- संस्कृती बदलणे भाजपने कर्तव्यच बनवले आहे
- केंद्रीय मंत्री गडकरींनी रस्ते सुरक्षेवरून व्यक्त केली चिंता, म्हणाले- मानसिकता बदलण्याची गरज आहे, मागे बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट लावावा