प्रतिनिधी
परभणी : संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्य सरकारने लपविल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.devendra fadanavis allaged govt has hidden corona deaths
देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दुपारी परभणी शहराच्या दौ-यावर दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व अन्य वरिष्ठ अधिका-यांबरोबर चर्चा केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी हितगुज केले.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या सरकारने लपविल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण दगावले.
ठकरे – पवार सरकारचे अपयशच त्यामागे कारणीभूत होते. परंतू सरकारने हे अपयश झाकण्याकरिता मृत्यूच्या संख्येचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला, असे नमुद केले.
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा नेमका आकडा कळाला पाहिजे. त्यासाठी आपण सरकारला जाब विचारू तसेच कोरोनाच्या या आपत्तीत सरकारने केलेल्या अक्षम्य अशा चुकाचाही शोध घेऊ, कोरोना अंतिम टप्प्यात आहे.
प्रादुर्भाव हळूहळू कमी होतो आहे. परंतु, या आपत्तीत साहित्य खरेदी असो, काळा बाजार असो, हितसंबंधी व्यक्तींना दिलेल्या कंत्राटांचे प्रकरण असो आदी बाबत चौकशीची मागणी केली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
devendra fadanavis allaged govt has hidden corona deaths
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर अफाट कामगिरी, अंध गिर्यारोहक झांग यांनी सर केले एव्हरेस्ट
- सुमार खटल्यांमुळेच राष्ट्रहिताचे विषय मागे पडत चालल्याची सर्वोच्च न्यायालयाची खंत
- कोरोनाविरोधातील लढाईमध्ये डॉक्टरांच्या हाती आता आणखी एक प्रभावशाली शस्त्र
- ग्राहकांना घरबसल्या दारु पोहोचवण्यासाठी विविध राज्ये सरसावली, काही राज्यांनी बनविली सरकारी ॲप
- अनाथांसाठीच्या योजनेचा आराखडा सादर करण्याचा न्यायालयाचा केंद्राला आदेश
- Corona Update : देशातील रुग्णसंख्या झपाट्याने घटली, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्के केंद्रीय आरोग्य मंत्रालय
- देशात कोरोनाविरोधी लसीचा तुटवडा नाही, एक कोटी लोकांना डोस देण्याची क्षमता; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
- पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा साखरपुडा ; आपल्या बहिणीशीच करणार लग्न ; बाबरवर यापूर्वी लैंगिक शोषणाचे आरोप