विशेष प्रतिनिधी
मुंबई : मारामारीचा खेद व्यक्त करतानाही जितेंद्र आव्हाडांची नसती मखलाशी, जयंत पाटलांची मध्यस्थी; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दोघांवर वरकडी!!, हे विधानसभेत घडले.
विधिमंडळाच्या पोर्चमध्ये झालेल्या मारामारीच्या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी खेद व्यक्त करावा, असे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले त्यानुसार पहिल्यांदी आमदार गोपीचंद पडळकर यांनी साध्या शब्दांमध्ये खेद व्यक्त केला. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील साध्याच शब्दांत खेद व्यक्त करणे अपेक्षित होते. पण जितेंद्र आव्हाड यांनी नुसता खेद व्यक्त करण्यापेक्षा भाषणच करणे सुरू केले.
नितीन देशमुख हा जितेंद्र आव्हाडांबरोबर आला होता, असा उल्लेख अध्यक्षांनी केला त्यावर तो माझ्याबरोबर आला नव्हता, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी करायला सुरुवात केली. विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशातले काही मुद्दे त्यांनी खोडून काढले. मात्र अध्यक्षांनी तुम्ही फक्त खेद व्यक्त करा, असे स्पष्ट शब्दात सुनावले. त्यावर आमदार जयंत पाटील उठले आणि जितेंद्र आव्हाडांना बोलू द्या, असे सांगायला सुरुवात केली. रोहित पवारांनी बसूनच तो आग्रह धरला.
जयंत पाटलांसारखे ज्येष्ठ आमदार जितेंद्र आव्हाडांच्या पाठीशी उभे राहिल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागेवरून उठले. त्यांनी घडलेल्या घटनेचे सगळे गांभीर्य सदस्यांच्या लक्षात आणून दिले. अध्यक्षांचे निर्देश कसे पाळायचे असतात हे परखड शब्दांमध्ये सांगितले. बाहेर लोक आपल्याला शिव्या घालताहेत. त्या काही एकट्या पडळकरांना शिव्या बसत नाहीत. आपण इथे बसलेले सगळे आमदार माजलेत असे लोकं बाहेर बोलताहेत. जयंतराव तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात. तुम्ही या घटनेचे गांभीर्य ओळखून बोलले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायला नकोय, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना ठोकून काढले.
जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील तसेच रोहित पवारांनी मारामारी प्रकरणाचे राजकारण केले, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात त्यांचे राजकारण विधानसभेच्या सभागृहातच उतरवून ठेवले.
Despite expressing regret over the fight, Jitendra Awhad was not a tyrant, Jayant Patil intervened
महत्वाच्या बातम्या
- Mahayuti Govt : महायुती सरकारची मोठी घोषणा- पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे
- एकनाथ शिंदेंशी युती करण्यासाठी आर्थिक फायदा मिळालाय का? वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना सवाल
- आव्हाड – पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र; कठोर कारवाईचे आदेश; पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त
- Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप