विशेष प्रतिनिधी
मुंबई : बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आला पुन्हा “लकवा”; नेत्यांच्या वक्तव्यातून दिसली हतबलता!! Desperation of Sharad Pawar and Prakash Ambedkar
त्याचे झाले असे :
प्रकाश आंबेडकरांनी आज बऱ्याच दिवसांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना लकवा झाल्याचा आरोप केला. विरोधक जनतेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचाच फोडत नाहीत. त्यांना लकवा मारल्यासारखे झाले आहे. त्यामुळे देशाचे महाराष्ट्राचे राजकारण टोकाचे धार्मिक बनले आहे. मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात, पण देशाचा घसरलेला रुपया त्यांना सावरता येत नाही विरोधकांनी स्वतःला लकव्यातून सावरून हिटलरशाही सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा “लकवा” शब्दाने एन्ट्री केली.
महाराष्ट्रात तब्बल ११ वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार असताना लकवा शब्दाने पहिली एन्ट्री मारली होती. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशा काही नाड्या आवळल्या होत्या, की पवारांना काही सांगताही येत नव्हते आणि सहनही होत नव्हते. पृथ्वीराज चव्हाण यांनीच पवारांच्या राष्ट्रवादीची भ्रष्टाचाराची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली होती. यामध्ये सिंचन घोटाळा आणि सहकारी बँक घोटाळा प्रमुख होते. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शरद पवार खूप संतापले होते. पण ते प्रत्यक्ष त्यांना काही करू शकत नव्हते म्हणून त्या संतापातूनच पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारल्याची अश्लघ्य शेरेबाजी केली होती. महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या कामाच्या अनेक फायली मंत्रालयात पडून आहेत, पण त्यांच्यावर सह्या करायला मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय, असे पवार म्हणाले होते.
आज बऱ्याच वर्षांनी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात तो “लकवा” शब्द पुन्हा आणला. पण यावेळी तो सत्ताधाऱ्यांसाठी वापरण्याऐवजी विरोधकांना टोला हाणण्यासाठी वापरला. पण या लकवा शब्दाचे वैशिष्ट्य असे की दोन्ही वेळेला तो वापरणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्यातून त्यांचीच हातबलता समोर आली.
Desperation of Sharad Pawar and Prakash Ambedkar
महत्वाच्या बातम्या
- CEC नियुक्ती कायद्यावरील सुनावणी लांबली; सुप्रीम कोर्टाने दिला होळीनंतरचा वेळ
- Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा
- Hamas : गाझा युद्धबंदी कराराच्या पुढील टप्प्याची अंमलबजावणी करण्यास तयार – हमास
- Rekha Gupta भाजपने रेखा गुप्तांच्या रूपाने दिल्लीला दिला चौथ्या महिला मुख्यमंत्र्याचा लाभ!!