विशेष प्रतिनिधी
मुंबई : शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदली प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेणे आणि त्याच वेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सचिन वाजेला सेवेत परत घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दबाव असल्याचे सांगणे हे एकाच दिवशी घडले आहे.Deshmukh’s naming of Parban and Paramvir Singh’s naming of Aditya and Uddhav Thackeray is to surround Shiv Sena
अनिल देशमुख आणि परमवीर सिंग यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या जबाबात वर उल्लेख केलेल्या बाबी नोंदविल्या आहेत. म्हणजे एकाच दिवशी अनिल देशमुख राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब यांचे नाव पोलीस बदली प्रकरणात घेणे आणि परमवीर सिंग यांनी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे नाव सचिन वाजे प्रकरणात घेतले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या घेरण्यासारखेच आहे. अन्यथा एकाच दिवशी हा “विशिष्ट योगायोग” साधण्यात आला नसता.
त्यातही एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. अनिल देशमुख यांनी हे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते असताना आणि त्यांना इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना बाजूला करून गृहमंत्रीपदी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेमले असताना स्वतः देशमुख फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटवर्ती अनिल परब यांच्या सूचना मानत असतील, असे मानणे राजकीयदृष्ट्या भाबडेपणाचे आहे.
पण त्यांनी म्हणजे अनिल देशमुख यांनी फक्त अनिल परब यांचे नाव घेतले आहे. त्याच वेळी त्यांनी अनिल परब यांच्याकडे कदाचित शिवसेनेचे आमदार आपल्याला अनुकूल असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी यासाठी आणि ती यादी अनिल परब आपल्याकडे सोबत असतील, असे म्हटले आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीच्या आमदारांना किंवा नेत्यांना अनुकूल असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याच नाहीत का? राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने अथवा आमदाराने पोलिसांच्या बदल्या संदर्भात कधी रदबदली केली नाही का?? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. परंतु या प्रश्नांवर अनिल देशमुख यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. कारण त्यांना असे प्रश्न विचारले, असे सूत्रांनी सांगितले नाही. म्हणूनच अनिल देशमुख आणि परमवीर सिंग यांच्या जबाबामधले विलक्षण साम्य हे राजकीय दृष्ट्या शिवसेनेला घेरणे असेच दिसत आहे.