Ajit Pawar convoy blocked by health workers : बीडमध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडवला होता. यावेळी कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून महिला कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. Deputy CM Ajit Pawar convoy blocked by health workers in Beed, women workers also beaten by police
विशेष प्रतिनिधी
बीड : बीडमध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडवला होता. यावेळी कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून महिला कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेदेखील आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक घेऊन उस्मानाबादकडे निघाले होते. तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून अजित पवारांच्या गाडीसमोर झोपण्याचा प्रयत्नही झाला. कंत्राटी कर्मचारी पवारांच्या गाडीसमोर येताच पालकमंत्री धनंजय मुंडे गाडीमधून बाहेर उतरले आणि आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. यात महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या, अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या
आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांची सेवा करत आहोत, मात्र शासनाकडून मनाला वाटेल तेव्हा आम्हाला काढलं जातं आणि पुन्हा कोरोना जास्त पसरला की, आम्हाला घेतलं जातं. यामुळे आम्ही ज्या पदावर काम करतोय, त्या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्या. ही मागणी घेऊन बीडमध्ये शेकडो महिला आणि पुरुष कर्मचारी आक्रमक झाले. परंतु या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला.
Deputy CM Ajit Pawar convoy blocked by health workers in Beed, women workers also beaten by police
महत्त्वाच्या बातम्या
- यामुळे होत नाहीत इंधनाचे दर कमी… करून ठेवलं यूपीएनं, निस्तरतंय मोदी सरकार! वाचा सविस्तर- ऑइल बाँड अन् १.३० लाख कोटींच्या थकबाकीविषयी
- Customized Crash Course : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसोबत लढणार 1 लाख वॉरियर्स ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली आणखी एक जबरदस्त मोहीम
- सचिन पायलट आता काँग्रेसचे तरूण नेते नाहीत, तर ज्येष्ठ नेते; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यातून झाला खुलासा
- सातारा जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग; कोयना धरणात ३ टीएमसी पाणी वाढले
- बंगालमध्ये भाजप फाटाफूटीचे आसाममध्ये पडसाद; राहुलजींच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावत काँग्रेसच्या तरूण आमदाराने सोडला पक्ष