महिलांविरुद्धचे गुन्हे आणि अवैध धंद्यावरील कारवायांचीही सादर केली आकडेवारी
प्रतिनिधी
मुंबई : विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या आणि इतरही चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत मुद्देसूद आणि सविस्तरपणे उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, ‘’ही संपूर्ण चर्चा ऐकली की मला एक शेर आठवतो, ‘याददाश्त का कमजोर होना, कोई बुरी बात नही जनाब बहुत बेचैन रहते है वो लोग जिन्हे हर बात याँद रहती है’ कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करताना आपण एक भान नेहमी ठेवले पाहिजे, सत्ता तुमची आमची बदलते पण, पोलीस दल तेच असते. ज्या घटना गेल्या काळात घडल्या, त्या दुर्दैवी होत्या. पोलीस दलात गुन्हेगारांचा शिरकाव झाला, राज्यातील उद्योजकांच्याच घरासमोर स्फोटके ठेवणे, पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, गृहमंत्रीच जेलमध्ये जाणे, खुद्द पोलिस आयुक्तांना जेलमध्ये जाण्याची वेळ येणे, नेत्यांविरुद्ध कट रचणे अशा अनेक घटना घडल्या.’’ Deputy Chief Minister Devendra Fadnavis reply to the Legislative Council on the final week proposal
सावरकरांचा पुन्हा अपमान; राहुल गांधींना कोलूवर जुंपा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधानसभेत संताप
महिलांविरुद्धचे गुन्हे आणि ऑपरेशन मुस्कान –
2022 मध्ये 44,221 गुन्हे घडले आणि गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण हे 2022 मध्ये 93.04 टक्के आहे. 2021 मध्ये ते 87 टक्के होते. बलात्काराचे गुन्हे निर्गती करण्याचे प्रमाण 2020 : 44 टक्के, 2021 : 56 टक्के, 2022 : 69 टक्के होते, आता हे प्रमाण 80 टक्क्यांच्या जवळ नेणे हे आपले लक्ष्य आहे. तसेच, ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 2015 ते 2022 या कालावधीत एकूण 11 ऑपरेशन राबवून 37,511 (यात 14,239मुली) बालकांचा शोध घेतला गेला. या मोहिमेचे केंद्र सरकारने कौतुक केले आहे. असं फडणवीसांनी सांगितलं.
अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई –
2022 मध्ये 13,647 गुन्हे, 5329 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 13 हजार 125 आरोपींवर कारवाई, अवैध वाळू उपसा प्रकरणी 3354 जणांवर कारवाई करण्यात आली व 93 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय 2021 मध्ये 138 डान्सबारवर कारवाई झाला आणि 2022 मध्ये 281 डान्सबारवर कारवाई केली गेली. दारुबंदीच्या 94,288 केसेसमध्ये 78 कोटींचा माल जप्त करण्यात आला. जुगाराच्या 30 हजार 085 केसेसमध्ये 46 कोटींचा माल जप्त झाला. तर 268 हुक्कापार्लरवरील कारवाईत 1127 जणांवर कारवाई झाली. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे PMAY घरांचे चौपट उद्दिष्ट ठरवून काही घोटाळे झाले. त्यावर गुन्हे दाखल झाले. काही जणांवर कारवाई केली. त्यावर पुढील कारवाई सुरू आहे. अपराध सिद्धीचा दर वाढविण्यासाठी 2014 पासून आपण अनेक निर्णय घेतले. एकूण 12 शासन आदेश काढण्यात आले. मला आनंद आहे की त्यावेळी 8 टक्के असलेला दर आता 48 टक्के झाला आहे.
पुणे आणि नाशिकमधील वाहतूक कोंडी –
पुण्याच्या रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले असून, या रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, मुंबई-पुणे मिसिंगलिंक कामासाठीही तरतूद करण्यात आली असून, पुण्यात मेट्रोची 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज ही मेट्रो सुद्धा कामे हाती घेणार आहोत. नाशिकमध्ये नियो मेट्रो, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी निधी देणार आहोत.
विरोधकांच्या चर्चेला उत्तराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘’चर्चाए खास हो तो किस्से भी जरुर होते है, उंगलिया भी उनपर ही उठती है, जो मशहूर होते है’’ असा शेर सादर करत केला.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis reply to the Legislative Council on the final week proposal
महत्वाच्या बातम्या
- ‘’भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे, ते स्वत: … ‘’ रविशंकर प्रसाद यांचा घणाघात!
- पुण्यातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्ग्याचं अतिक्रमण – मनसेचा दावा!
- उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींचे मानले आभार
- बोफोर्सच्या बदल्यातून मोदी – अदानींवर आरोप; काँग्रेसला राहुल गांधींमध्ये सापडले विश्वनाथ प्रताप सिंहांचे रूप!!