छोड़ेंगे नही ! केवळ लोकसभा नाही, तर विधानसभेत सुद्धा महायुती दणदणीत विजय संपादन करणार!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : वरळी येथे ‘महायुती लोकसभा २०२४- मिशन ४८’ ही महाबैठक आज पार पडली.याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून विरोधकांच्या इंडिया आघाडीवर निशाणा साधत, त्यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized the oppositions India Alliance
फडणवीस म्हणाले, ”आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला आहे, आमच्यात कुठेच दुमत नाही. वन अँड द ओन्ली वन पंतप्रधान नरेंद्र मोदी! तुमचा एक तरी उमेदवार सांगा? इंडी आघाडीची आताच भिंडी आघाडी झाली आहे. लोगो अनावरण होऊ शकत नाही, हे सांगण्याचे काम आमच्या विजय वडेट्टीवार यांच्याकडे आले.”
याचबरोबर ” सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कुणाच्या बापाची हिंमत नाही, पण कॅमेराजिवी नेत्यांना कसे समजणार? मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणे, ही म्हण का पडली, हे लहानपणी समजले नव्हते. जेव्हा कोविड काळात मुंबईतील मृतदेह नेण्यासाठी ६०० रुपयांची बॅग साडेसहा हजार रुपयांमध्ये खरेदी केली गेली, तेव्हा त्याचा अर्थ कळला. छोड़ेंगे नही ! केवळ लोकसभा नाही, तर विधानसभेत सुद्धा महायुती दणदणीत विजय संपादन करणार!” असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं.
या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रहारचे बच्चू कडू, रासपचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, जनसुराज्यचे आमदार विनयजी कोरे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र जी कवाडे, युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री, खासदार, आमदार आणि महायुतीमध्ये सहभागी असलेल्या विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized the oppositions India Alliance
महत्वाच्या बातम्या
- नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??
- मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!
- मराठमोळे अजय पुरकर आता टॉलीवूड गाजवणार ! दक्षिणात्य हिरो व्हीलन समोर मोठ आवाहन!
- संसदेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांना “भूल”, की “एक देश एक निवडणुकीची” चाहूल?