देवेंद्र फडणवीस यांनी केले लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर होणे, हा एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ सन्मान आहे, असे सांगत या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले आहे.Deputy Chief Minister Devendra Fadnavis congratulated LK Advani on the announcement of Bharatna Award
लालकृष्ण अडवाणी यांनी ‘लोहपुरुष’ या नात्याने एक कणखर गृहमंत्री म्हणून देशाची सेवा केली. विशेषत: श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. सुमारे 6 दशके त्यांनी राजकारणात घालविली. एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व तर ते आहेतच, शिवाय राष्ट्रसेवेत त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. राजकारणात अशाप्रकारचे चारित्र्य त्यांनी सांभाळले आणि विविध विषयांचा त्यांचा सातत्याने व्यासंग राहिला. त्यांना भारतरत्न ही उपाधी जाहीर झाल्याबद्दल मला व्यक्तिगत आनंद झाला आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली. खुद्द पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली.
तर लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याची बातमी समजताच ते भावूक झाले. लालकृष्ण अडवाणी यांची पहिली झलक समोर आली आहे, ज्यामध्ये ते जनतेला आणि मीडियाला हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis congratulated LK Advani on the announcement of Bharatna Award
महत्वाच्या बातम्या
- उत्तराखंड सरकारला समितीने UCC ड्राफ्ट सादर केला; मुख्यमंत्री धामी म्हणाले- बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती
- INDI आघाडी शिल्लकच नाही; महाविकास आघाडीच्या बैठकीला जाऊन आल्यावर प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!!
- छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या सोडल्या पुड्या; फडणवीसांनी काढली सुळे – दमानियांची हवा!!
- राहुल गांधींच्या plural politics ची परिणीती कुठे पोहोचली, ते पहा; काँग्रेसचाच खासदार स्वतंत्र दक्षिण भारत देश मागू लागलाय बघा!!