• Download App
    उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर। Deputy Chief Minister Ajit Pawar will visit Jalgaon district tomorrow

    उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

    मुख्‍य म्‍हणजे राज्‍यात सरकार स्‍थापनेनंतर ते प्रथमच जळगावात येत आहे.अजित प्रथमच जळगावात येत असल्‍याने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून आहे. Deputy Chief Minister Ajit Pawar will visit Jalgaon district tomorrow


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता.१७) प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.जिल्‍ह्यात विविध कामांचा शुभारंभनिमित्‍त तसेच कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील.उपमुख्‍यमंत्री पवार हे जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री आहेत. मुख्‍य म्‍हणजे राज्‍यात सरकार स्‍थापनेनंतर ते प्रथमच जळगावात येत आहे.अजित प्रथमच जळगावात येत असल्‍याने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून आहे.



    असा असेल अजित पावरारांचा दौरा

    उद्या (शुक्रवारी) सकाळी ८ वाजता अजित पवार हे विमानाने जळगाव विमान तळावर येतील. तेथून अजिंठा विश्रामगृहावर ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. यानंतर सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी बैठक, त्यानतंर जिल्हा दूध विकास संघाच्या नवीन दूध प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करतील. त्यानतंर ते भुसावळ येथे रवाना होवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

    Deputy Chief Minister Ajit Pawar will visit Jalgaon district tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले