• Download App
    टंचाई असलेल्या गावात टँकरने पाणीपुरवठा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the assembly that water will be supplied by tankers to the villages facing shortage

    टंचाई असलेल्या गावात टँकरने पाणीपुरवठा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पाऊस न पडल्याने राज्याच्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. राज्यातल्या एकाही तालुक्यात किंवा खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाऊस पडून पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the assembly that water will be supplied by tankers to the villages facing shortage

    विधानसभा सदस्य राजेश टोपे आणि जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपल्या राज्यात साधारणपणे जून महिन्यात पाऊस पडतो. त्यामुळे 30 जूनपर्यंत टँकर सुरु ठेवण्यात येतात. परंतु अद्यापही राज्याच्या काही भागात पाऊस पडलेला नाही.

    तिथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा तालुक्यात किंवा गावात 30 जूननंतरही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील. राज्यातील कुठल्याही खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. याबाबतही त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

    Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the assembly that water will be supplied by tankers to the villages facing shortage

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Election Commission : आयोगाने केले विरोधकांच्या शंकांचे निरसन, संभाव्य दुबार मतदारांसह कास्ट व्हॅलिडिटीवर काय म्हटले, वाचा सविस्तर

    Sandeep Deshpande : बोगस मतदार आढळल्यास ‘मनसे स्टाइल’ने दणका देणार; संदीप देशपांडे म्हणाले- पुरावे देऊनही आयोगाकडून कारवाई नाही

    Devendra Fadnavis : पुण्यात स्वबळावर लढणार:भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसशी सामना; मनपा निवडणूक जाहीर होताच CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले