• Download App
    राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांनी केलं मोठं विधान ; म्हणाले-समीर वानखेडेंनी धर्मांतर केल्याचं दिसत नाही|Deputy Chairman of the National Backward Classes Commission made a big statement; He said that Sameer Wankhede does not seem to have converted

    राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांनी केलं मोठं विधान ; म्हणाले-समीर वानखेडेंनी धर्मांतर केल्याचं दिसत नाही

    वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे आणि एक निवेदनही हलदर यांना दिलं. त्यानंतर हलदर यांनी मीडियाशी बोलताना वानखेडे यांनी धर्मांतर केलं नसल्याचं स्पष्ट केलं.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कागदपत्रे मी तपासली आहेत. वानखेडे यांनी धर्मांतर केलं नाही असं सकृतदर्शनी दिसून येतं, असं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे.Deputy Chairman of the National Backward Classes Commission made a big statement; He said that Sameer Wankhede does not seem to have converted

    राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांनी आज भेट घेतली. या दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे आणि एक निवेदनही हलदर यांना दिलं. त्यानंतर हलदर यांनी मीडियाशी बोलताना वानखेडे यांनी धर्मांतर केलं नसल्याचं स्पष्ट केलं.



    हलदर यांनी सांगितले की ,काही लोक कुटुंबावर जातीवरून अटॅक करत आहेत. त्यामुळे वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही शेड्यूल कास्टचे आहात का? असं मी वानखेडेंना विचारलं. त्यांनी हो म्हणून सांगितलं. तसेच काही पुरावेही सादर केले.

    मी ड्रग्सच्या विरोधात काम करत आहे त्याचमुळे काही लोक मला जातीच्या आधारावर शिवीगाळ करत आहेत. काही लोक माझ्यावर जाणूनबुजून आरोप करत आहेत, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्याशी बोलताना ते शेड्यूल कास्टच्या महार जातीचे असल्याचं मला जाणवलं. त्यांनी फॅमिली मॅटर मला सांगितलं. त्यांचा विवाह स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार झाला होता. त्यांचे रेकॉर्डही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

    वानखेडे हे शिक्षित आहेत. ते कायदा जाणतात. त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत, असं सांगतानाच आमच्याकडे त्यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करू. पण कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करतं ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपलं काम करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    दरम्यान, हलदर यांच्या भेटीनंतर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.वानखेडे म्हणाले की ,” मी मागासवर्गीय आयोगाच्या उपाध्यक्षांना भेटायला आलो होतो. त्यांना माझा अर्ज दिला आहे. त्यांच्याशी चर्चाही केली. तसेच आयोगाच्या अध्यक्षांनाही आधीच निवेदन पाठवलेलं आहे.”

    Deputy Chairman of the National Backward Classes Commission made a big statement; He said that Sameer Wankhede does not seem to have converted

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस