प्रतिनिधी
मुंबई : माहीमच्या बेकायदेशी मजारी संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओ दाखवून इशारा दिला आणि शिंदे – फडणवीस सरकारने अवघ्या 12 तासांत कारवाई करीत त्या बेकायदेशीर मजारीवर सरकारचा बुलडोझर चालविला. तिथला हिरवा झेंडा हटविला. त्या मजारी भोवतीचे बाकीचे बेकायदा बांधकाम आज सकाळी 7.00 नंतर कारवाई करून तोडले आहे. राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर अवघ्या 12 तासात ही कारवाई झाल्याने राज ठाकरे इफेक्ट कसा असतो??, याचेच प्रत्यंतर महाराष्ट्राला आले आहे. Demolition drive started at the encroached site of ‘Dargah’ amid heavy police deployment at Mahim beach in Mumbai
माहीमच्या समुद्रात ही कुणाची समाधी बांधली आहे माशाची एका पिंगवींची पेंग्विनची असा सवाल राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात शिंदे – फडणवीस सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर कोरडे ओढले होते. पण आज सकाळीच महापालिका प्रशासन आणि पोलीस यांनी धडक कारवाई करून समुद्रातील सर्व बेकायदा बांधकाम पाडून टाकले आणि तिथे आता पूर्णपणे जागा मोकळी करून टाकली.
यापुढे आता सांगली जिल्ह्यातील कुपवाड मधील मंगलमूर्ती कॉलनी जी बेकायदा मशीद उभी राहत आहे, त्या संदर्भात शिंदे – फडणवीस सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार??, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. कारण राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात माहीमच्या बेकायदा मजारीचा विषय काढण्याआधी मंगलमूर्ती कॉलनीतील बेकायदा मशीद आणि तिथली गुंडगिरी हा विषय व्हिडिओ सह मांडला होता. त्यामुळे आता माहीमच्या बेकायदा मजारीवर बुलडोझर चालविल्यानंतर सांगली जिल्ह्यातील कुपवाड मधील मंगलमूर्ती कॉलनीतील बेकायदा मशिदीवर शिंदे – फडणवीस सरकार काय कारवाई करणार??, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Demolition drive started at the encroached site of ‘Dargah’ amid heavy police deployment at Mahim beach in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात बनावट छापा, 3 GST निरीक्षक बडतर्फ; दोन वर्षांपूर्वी टॅक्सच्या नावाखाली व्यावसायिकाकडून उकळले 11 लाख रुपये
- सरन्यायाधीश म्हणाले- फेक न्यूजमुळे तणाव वाढण्याचा धोका, देशातील लोकशाहीसाठी प्रेसचे स्वातंत्र्य आवश्यक
- शरद पवारांनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, 2024च्या लोकसभा निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरने घेण्यावर चर्चा होणार
- नितीन गडकरींच्या भाषणातून प्रेरणा घेत महिलांच्या नेतृत्वात सर्वात मोठ्या महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट चेनची निर्मिती करणाऱ्या जयंती कठाळेंचे भावनिक पत्र, म्हणाल्या…