नाशिक : लोकशाहीच्या तोंडी गप्पा, पण लोकनियुक्त सरकारच्या शपथविधीला दांडी मारा!! अशीच भूमिका शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय कृतीतून समोर आली आहे.
नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीतल्या काळातले राजकीय वैर विसरून माजी मुख्यमंत्री शरद पवार, उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे आदी नेत्यांना स्वतः फोन करून शपथविधीचे निमंत्रण दिले. परंतु, या तिन्ही नेत्यांनी वेगवेगळी कारणे देत शपथविधीला हजर राहण्याचे नाकारले. तशा बातम्या आता मराठी माध्यमांनी चालविल्या आहेत.
– पवार संसद अधिवेशनात सायंकाळी व्यग्र
दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन सुरू आहे त्यामुळे आपल्याला शपथविधीला हजर राहता येणार नाही, असे शरद पवारांनी फडणवीसांना कळविण्याचे मराठी माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले. संसदेच्या अधिवेशन काळात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या बैठकांचा बैठकांची वेळ सर्वसाधारणपणे सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00 अशी असते. फडणवीस यांचा शपथविधी सायंकाळी 5.30 वाजता मुंबईत होणार आहे. त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसेच 22 राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. याच दरम्यान शरद पवार मात्र संसदेच्या अधिवेशनातच व्यग्र राहणार आहेत.
– ठाकरेंचे गैरहजेरीचे कारण “अज्ञात”
- उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आपल्या गैरहजेरीचे कारण सांगितले नाही. मात्र राज ठाकरे यांच्या काही वैयक्तिक भेटीगाठी शपथविधीच्या वेळेतच असल्याने कार्यक्रमाला हजर राहता येणार नसल्याचे राज ठाकरेंनी फडणवीसांना कळविण्याचे बातम्यांमध्ये नमूद केले आहे.
- वर उल्लेख केलेल्या सगळ्या नेत्यांनी गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये सतत लोकशाहीच्या नावाने ढोल पिटले होते. संसदीय परंपरा, राजकीय मतभेद त्याचबरोबर राजकीय मतऐक्य यावर लंबीचवडी व्याख्याने दिली होती. सभा आणि विधानसभा निवडणूक काळामध्ये “संविधान बचाव” असा नारा देत संविधानाची पुस्तके घेऊन हेच नेते सगळीकडे हिंडत होते.
- पण आता लोकनियुक्त सरकारच्या शपथविधीला मात्र हजर राहायला त्यांना वेळ नसल्याचे बातम्यांमधून समोर आले.
- “कोणत्याही परिस्थितीत फडणवीस नको”, हा पवार + ठाकरे आणि काँग्रेसचा अजेंडा आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम होता. पण तो महाराष्ट्राच्या जनतेने नाकारला. पवार + ठाकरे आणि काँग्रेसला जोरदार तडाखा दिला.
- त्या धक्क्यातून सावरण्यासाठी EVMs वर दोषारोप करून निवडणूक निकाल नाकारण्याची सगळी तयारी सुरू असतानाच भाजपने पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली. त्यामुळे पवार + ठाकरे आणि काँग्रेस यांना आणखी एक शॉक बसला. आता या शॉक मधून सावरताच येणार नाही म्हणून प्रत्यक्ष शपथविधी सोहळ्याला हजरच राहायला नको, असा “पॉलिटिकल एस्केपिझम” या नेत्यांनी स्वीकारला.
- यातून फडणवीस द्वेषाचा पुढचा अंक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार + ठाकरे आणि काँग्रेसने सुरू केला.
- शिवाय अगदी फडणवीसांच्या निमंत्रणानुसार पवार ठाकरे आणि बाकीचे काँग्रेस नेते शपथविधीला हजर राहिले असते, तरी त्यांच्या जागा व्हीव्हीआयपी रांगांमध्ये ठेवल्या असत्या. पण सगळ्या “मीडिया ग्लेअर” मोदी + शाह + फडणवीस + शिंदे यांच्यावरच राहणार. शिवाय पाच – दहा मीडिया प्रतिनिधी शपथविधी संदर्भात प्रतिक्रिया विचारायला येणार, त्यावेळी राजकीय सौजन्य म्हणून फडणवीसांविषयी चार शब्द चांगले बोलायला लागणार, त्याच्या बातम्या माध्यमे देणार, त्यापेक्षा शपथविधीला जाणेच टाळले, तर फक्त गैरहजेरीच्या बातम्या येतील, पण आपल्या तोंडून फडणवीस स्तुतीचे “पाप” तरी घडणार नाही, असा “पोक्त” राजकीय विचार ठाकरे + पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केला असल्यास त्यात नवल नाही.
Democracy lover leaders not attend swerving in ceremony of democratic government
महत्वाच्या बातम्या
- Ratapani Sanctuary : मध्य प्रदेशातील रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प घोषित
- Defence संरक्षण अधिग्रहण परिषदेने 22 हजार कोटी रुपयांच्या पाच प्रस्तावांना दिली मंजुरी
- Eknath Shinde : एकीकडे एकनाथ शिंदेंची राजी – नाराजी; दुसरीकडे भाजपची हिंदू ऐक्याच्या नव्या राजकारणाची पायाभरणी!!
- Israeli mosques : इस्रायलच्या मशिदींमधून स्पीकर हटणार, पोलिसांना स्पीकर जप्त करण्याचे आदेश