Wednesday, 7 May 2025
  • Download App
    Demand for Tadoba Tiger Project to be opened for tourists

    ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प खुला करण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    चंद्रपूर : देशातील एकही व्‍याघ्र प्रकल्‍प सद्यःस्थितीत बंद नाही. कोरोना संसर्गामुळे बंद करण्‍यात आलेला ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प पर्यटकांसाठी खुला करण्‍यात यावा अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. Demand for Tadoba Tiger Project to be opened for tourists

    या संदर्भात मुनगंटीवार यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्‍य सचिव असीम गुप्‍ता आणि जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांच्‍याशी चर्चा केली. शिष्‍टमंडळात संजय मानकर, संजय ढिमोले, आशिष पुराणिक, शुभम ढिमोले आदी होते.

    मुनगंटीवार म्‍हणाले की, कोरोनाच्‍या वाढत्‍या संसर्गामुळे ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प पर्यटकांसाठी बंद करण्‍यात आला होता. कोरोनाची रूग्‍णसंख्‍या आता आटोक्‍यात आली असल्‍याने व्‍याघ्र प्रकल्‍प पर्यटकांसाठी खुला करण्‍यास आता कोणतीही हरकत नाही. व्‍याघ्र प्रकल्‍प बंद असल्‍यामुळे परिसरातील रिसोर्ट व्‍यावसायिक तसेच त्‍यावर अवलंबून असलेल्‍या घटकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील एकही व्‍याघ्र प्रकल्‍प सद्यःस्थितीत बंद नाही. अशा परिस्‍थीतीत केवळ ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प बंद असणे संयुक्‍तिक नाही. हा व्‍याघ्र प्रकल्‍प त्‍वरीत पर्यटकांसाठी खुला करण्‍यात यावा.

    व्‍याघ्र प्रकल्‍प पर्यटकांसाठी खुला करण्‍याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्‍यात येईल, असे आश्‍वासन गुप्‍ता यांनी दिले.

    Demand for Tadoba Tiger Project to be opened for tourists

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट