विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. अंतर्गत मूल्यांकनावरच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत शिक्षकी पेशालाच काळिमा फासलचा प्रकार पुण्यातील मध्य वस्तीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात घडला आहे. एका विद्यार्थिनीला उत्तीण करण्याच्या बदल्यात शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केली. पालकांना हे समजल्यावर महाविद्यालयात येऊन त्याची पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढण्यात आली. Demand for sex from a student in exchange for raising the marks, incident in well know college in pune
विश्रामबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीच्या परीक्षेत तुला गुण वाढवून देतो, असं सांगून अभिजित पवार हा विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तो वारंवार अशा प्रकारे मागणी करत असल्यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती.
मात्र, नकार देऊन देखील प्रकार सुरूच राहिल्यामुळे अखेर या विद्यार्थिनीने शिक्षक अभिजित पवारने केलेला फोनकॉल रेकॉर्ड केला. आपल्या पालकांना, तसेच नातेवाईकांना ऐकवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संतप्त झालेले पालक, नातेवाईक शिक्षकाला जाब विचारण्यासाठी थेट महाविद्यालयात आले. यावेळी विद्यार्थिनी देखील सोबत होती. यावेळी अभिजित पवारला सगळ्यांनी रंगेहाथ पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. त्याच्या तोंडाला शाई फासून त्याची महाविद्यालयातून थेट विश्रामबाग पोलीस स्थानकापर्यंत धिंड काढण्यात आली. पोलिसांनी अभिजित पवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाईल असे सांगण्यात आलं. त्यासाठी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या माध्यमातून गुण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली. मात्र, याचाच गैरफायदा पुण्यातील एका नामांकित शाळेच्या शिक्षकानं घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून संताप व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. ११ वी शिकत असलेल्या मुलीला १२वी ला मार्क वाढवून देतो व पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मागणी करण्याची संतापजनक व लज्जास्पद घटना पुण्यात घडली आहे. या प्रकारच्या घटनांचे सत्र राज्यात सर्वत्र सुरू आहे. जनता वाऱ्यावर आणि सत्ताधारी एकमेंकांना सांभाळण्यात दंग आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
Demand for sex from a student in exchange for raising the marks, incident in well know college in pune
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांना राष्ट्रपती बनविण्यासाठी प्रशांत किशोरांकडून विरोधकांची जमवाजमव, राहुल गांधींशी बैठकीनंतर चर्चांनी धरला जोर
- फादर स्टेन स्वामींना नोबेल मिळावा, त्यांच्या राज्य प्रायोजित मृत्यूची सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी – ज्युलियो रिबेरो
- No miniti bank or pigy bank its Modi bank; लहान मुलांना बचती सवय लावण्यासाठी बिहारमध्ये कारागिराने घडविली मोदी बँक
- ओढून ताणून आणा, पटोले नाना…!!; पवारांनी छोटा माणूस म्हटलेल्या नानांना सामनातूनही कानपिचक्या
- शैक्षणिक शुल्कनिश्चितीचा प्रस्ताव खुंटीला टांगला; भाजपाचे शिवराय कुळकर्णी यांचा सरकारवर आरोप