• Download App
    मुंबईतही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव, कोरोना चाचण्या होणार दुप्पट Delta Plus virant enters in Mumabai

    मुंबईतही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव, कोरोना चाचण्या होणार दुप्पट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोनाच्या डेल्टा प्लस हा प्रकार तिसऱ्या लाटेसाठी प्रमुख कारण ठरू शकतो. म्हणूनच या कोरोना व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये, याची खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेने सुरू केल्या आहेत. पालिकेने पुन्हा चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून दुसऱ्या लाटेच्या तुलनेत या वेळी दुप्पट क्षमतेने चाचण्या करणार आहेत. Delta Plus virant enters in Mumabai

    मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत कोरोना डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडू लागले आहेत. सध्या मुंबईत दररोज सरासरी ३० हजार लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. दुसऱ्या लाटेमध्ये चाचण्यांची संख्या ५० हजारांवर गेली. या वेळी चाचण्या यापेक्षा अधिक वाढवल्या जाणार आहेत.



    जास्त गर्दी असलेल्या भागात, झोपडपट्ट्यांमध्ये आणि निवासी भागात चाचण्या वाढवल्या जाणार आहेत. सध्या मुंबईतील मॉल बंद असून पुन्हा सुरू झाल्यास येथेही कोव्हिड चाचण्या घेतल्या जातील.

    Delta Plus virant enters in Mumabai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात