विशेष प्रतिनिधी
अंबरनाथ : एका महिलेची प्रसूती टेम्पोमध्ये झाल्याने यात नवजात बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात घडली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील म्हात्रे पाडा या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या वंदना वाघे यांच्या बाबतींत ही घटना घडली आहे. Delivery of a woman in tempo in Ambernath taluka
वंदना यांना मध्यरात्री प्रसूतीसाठी मांगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टेम्पोतून घेऊन जाण्यात आले.मात्र या आरोग्य केंद्रात सुविधा नसल्याने वंदना यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जा, असे तिथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटूंबियांना सांगितले. मात्र उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जात असताना मध्येच टेम्पोत त्यांची प्रसूती झाली. यात त्यांचे बाळ दगावले.
मांगरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्या सुविधा नाहीत परिणामी अत्यावश्यक वेळी येथे रुग्णांवर उपचार न करता पुढे पाठवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे या आरोग्य केंद्राचा नक्की उपयोग काय ? असा सवाल रहिवासी करत आहेत. गेल्या वर्षभरात अशाच तीन घटना घडल्या असून त्यातही नवजात बाळ दगावले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.आता तरी आरोग्य यंत्रणेला जाग येणार का असा प्रश्न नागरिक करत आहे.
- अंबरनाथ तालुक्यात महिलेची टेम्पोमध्ये प्रसूती
- मलंगगड आदिवासी पाड्यातील महिलेवर प्रसंग
- मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नाही
- उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेताना प्रसूती
- गेल्या वर्षभरात ३ नवजात बाळ दगावली
- आता तरी आरोग्य यंत्रणेला जाग येणार का ?
Delivery of a woman in tempo in Ambernath taluka
महत्त्वाच्या बातम्या
- बंगालचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादळी होण्याची शक्यता, ममता सरकारने दिलेले अभिभाषण वाचण्यास राज्यपालांचा नकार
- मुंबईत आणखी एक बनावट कोरोना लसीकरण शिबीर उघडकीस, पाच जणांना अटक
- Job In Barti : बार्टीमध्ये शासकीय सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने पदभरती, दहा पदांसाठी मागवण्यात आले अर्ज
- Anganwadi Sevika Recruitment 2021 : सातवी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी, बाल विकास प्रकल्प जालनामार्फत अंगणवाडी सेविकांची भरती; 9 जुलैपर्यंत करा अर्ज
- Sputnik Light : रशियाच्या स्पुतनिक लाइट सिंगल डोस लसीला तातडीची मंजुरी नाकारली, औषध नियामकांनी फेज-3 चाचणीचा डेटा मागितला