प्रतिनिधी
मुंबई : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला विलंब झाला आहे. मंडळाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही या ठिकाणी दाखल झाले आहेत. मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत साधारण तासभर चाललेल्या या बैठकीनंतर अखेर विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Delay in the installation of the King of Lalbaug;Police threatens to impose Section 144 again in case of crowd
माध्यमांशी बोलताना नांगरे पाटील म्हणाले, कलम १४४ खाली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले होते. मात्र, मंडळाशी चर्चा केल्यानंतर असे ठरले आहे की, दुकानात फक्त दोन जणांना मंडळ आणि मुंबई पोलिसांकडून पास दिला जाईल.
आरतीलाही फक्त १० लोकांना परवानगी असेल. जर या नियमांचा भंग झाला तर पुन्हा कलम १४४ चे आदेश लागू करण्यात येतील. भाविकांना कोणत्याही प्रकारचं मुखदर्शन घेता येणार नाही. मात्र, ऑनलाईन दर्शन सुरू आहे.
मुंबई पोलिसांच्या अतिसुरक्षेमुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. परिसरातली दुकानंही बंद ठेवण्यात आलं असून नागरिकांच्या घरी येण्याजाण्याच्या रस्त्यावरही पोलीस बंदोबस्त तैनात आहे. लालबागच्या राजाची स्थापना करणारे स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून
त्यांची दुकानं बंद केल्याने लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज होते. मात्र पोलिसांनी यावर आता तोडगा काढला आहे. लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भाविक लालबागमध्ये येणार नाहीत.
लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी साधारण तासभर चर्चा केली. आरतीच्या वेळी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तर मंडळांनीही सर्व नियमांचे पालन करण्याचेआश्वासन दिल्याने पोलीस आणि मंडळांच्या समन्वयाने हा प्रश्न सुटला आहे.
Delay in the installation of the King of Lalbaug;Police threatens to impose Section 144 again in case of crowd
महत्त्वाच्या बातम्या
- Governors Changed : अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले ; उत्तराखंडच्या राज्यपालपदी गुरुमीत सिंह ; पंजाबच्या राज्यपालपदी बनवारी लाल पुरोहित
- विज्ञानाची डेस्टीनेशन्स : गपरव्हिडिओ गॉगलमधील आवाजाच्या माध्यमातून अंध वाचायलाही शिकणार ..
- खासदारांसाठी थलायवीचे विशेष स्क्रीनिंग, कंगनाने स्मृती इराणींची केली स्तुती
- विज्ञानाची गुपिते : हवेमध्ये शंभर टक्के ऑक्सिजन असता तर?