• Download App
    हद्दीत घुसणाऱ्यांनाच नाही सीमेपलीकडील दहशतवाद्यांनाचाही खात्मा करू शकतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा|Defense Minister Rajnath Singh warns not only those who cross border but also terrorists across border

    हद्दीत घुसणाऱ्यांनाच नाही सीमेपलीकडील दहशतवाद्यांनाचाही खात्मा करू शकतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    धुळे : भारतीय सैन्य हद्दीत घुसणाऱ्या आणि सीमेपलीकडील दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पाकिस्तानला दिला आहे. भारतााने आजवर कोणावर आक्रमण केले नाही, पण कोणी छेडले तर त्याला सोडत नाही असेही त्यांनी सांगितले.Defense Minister Rajnath Singh warns not only those who cross border but also terrorists across border

    राजनाथ सिंह यांच्या हस्ते दोंडाईचा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. सिंह म्हणाले की, मला आपल्या शेजारी राष्ट्राला विचारायचे आहे की, त्यांना आपल्या देशाला अस्थिर करायचे आहे का? याआधी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक नव्हते परंतु, आम्ही ते केले.



    भारताने आजवर आक्रमण केलेले नाही किंवा कब्जा केलेला नाही. पण, जर भारताला एखाद्याने छेडेल त्याला भारत सोडणार नाही हे सांगत आम्ही केवळ भारताच्या हद्दीतच नव्हे तर, सीमेपलिकडेही जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो असा इशारा त्यांनी दिला.

    सगळे बदलू शकतात पण शेजारी बदलू शकत नाहीत असे सांगून राजनाथ सिंह म्हणाले, जेव्हापासून देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून फक्त आश्वासने दिली गेली. नेत्यांवरील विश्वास कमी झाला आहे. मात्र आम्ही जे बोलू ते करून दाखवू. 2019 च्या जाहीरनाम्यात जे लिहिले होते ते पूर्ण करू.

    मला महाराष्ट्रात आल्यानंतर खूप आनंद होतो, असे सांगत मी उत्तरप्रदेशातून आलो असून उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांचा जवळचा संबंध आहे. वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख असल्याचे त्यांनी मराठीतून सांगितले. यावेळी लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

    Defense Minister Rajnath Singh warns not only those who cross border but also terrorists across border

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस