• Download App
    बॅडमिंटनपटू सायना नेहवालला हरवणारी मालविका बनसोड देशाची नवी आशा|Defeating badminton player Saina Nehwal New hope for Malvika Bansod country

    बॅडमिंटनपटू सायना नेहवालला हरवणारी मालविका बनसोड देशाची नवी आशा

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : – बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालला दोन सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोडने इतिहास निर्माण केला आहे. या विजयाबरोबर बॅडमिंटनमध्ये सायना, पी.व्ही.सिंधू यांच्यानंतरही देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्याकरीता नवीन पिढी सज्ज असल्याचे मालविकाने दाखवून दिले आहे.Defeating badminton player Saina Nehwal New hope for Malvika Bansod country

    मुळची नागपूरच्या असणाऱ्या मालविका बनसोडने इंडियन ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये इतिहास घडवला आहे. २० वर्षांच्या मालविकाने सायना नेहवालला पराभूत करत बॅडमिंटन जगतामध्ये खळबळ उडवून दिली आहे. मालविकाने सायनाला २१-१७ आणि २१-०९ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आहे.



    जागतिक क्रमावारीत सायना २५ व्या तर मालविका १११व्या क्रमांकावर आहे.मालविकाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि विश्वराज ग्रुपचे प्रमुख अरुण लखानी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच २०१९पासून तिला लखानी यांनी मदत देखील केली आहे.

    “मालविकाने मिळवलेले यश प्रचंड मोठे आहे, पण ते अनपेक्षित नक्कीच नाही. तिच्यात प्रचंड क्षमता आहे. मोठ्या स्तरावरील स्पर्धा खेळून देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करण्याची तिची क्षमता आहे. तिचे भविष्य उज्ज्वल आहे. मालविकाचे प्रशिक्षक संजय मिश्रा आणि तिच्या आई-वडिलांच्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे.

    ” या शब्दात लखानी यांनी मालविकाचे कौतुक केले आहे. मालविका ही महाराष्ट्राची एक उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार आहे. अंडर -१३ आणि अंडर -१७ या राज्यस्तरीय स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. २०१८मध्ये जागतिक जुनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली होती.

    २०१८मध्ये तिने साऊथ एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवला होता. तर २०१९मध्ये तिने ऑल इंडिया सीनिअर रँकिंग टुर्नामेंटमध्येही विजय मिळवला होता. २०१९मध्ये मालविकाने मालदीव्ज आंतरराष्ट्रीय फ्युचर सीरिज स्पर्धा जिंकली होती.

    Defeating badminton player Saina Nehwal New hope for Malvika Bansod country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!