• Download App
    सातारा जिल्हा बँक निवडणुकीत फक्त शशिकांत शिंदेच नव्हे, तर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचाही पराभव । Defeat not only Shashikant Shinde, but also Minister of State for Home Affairs Shambhuraje Desai in Satara District Bank elections

    सातारा जिल्हा बँक निवडणुकीत फक्त शशिकांत शिंदेच नव्हे, तर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचाही पराभव

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीमध्ये ११ जागा बिनविरोध निवडून आल्या असल्या तरी या बँकेची निवडणूक गाजते आहे ती दोन दिग्गजांच्या पराभवामुळे…!! Defeat not only Shashikant Shinde, but also Minister of State for Home Affairs Shambhuraje Desai in Satara District Bank elections

    दस्तुरखुद्द शरद पवार यांनी फोन करून देखील माजी आमदार शशिकांत शिंदे यांना एका मताने पराभूत व्हावे लागले, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शिवसेना नेते शंभूराजे देसाई यांना तब्बल 14 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. जावळी सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी एका मताने पराभव केला. रांजणे यांना 25 मते मिळाली तर शशिकांत शिंदे यांना 24 मते मिळाली. शिंदे यांच्यासाठी निवडणुकीत स्वतः शरद पवार यांनी लक्ष घालून आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार मकरंद पाटील यांना फोन केले होते. तरीही शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला आहे.



    पाटण सोसायटी मतदार संघातून सत्यजितसिंह पाटणकर हे विजयी झाले आहेत. त्यांना 58 मते मिळाली, तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना 44 मते मिळाली. शंभुराजेंचा पराभव हा सातारा जिल्हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा शंभूराजे देसाई यांनी सुमारे तीन दशके फडकवत ठेवला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होणे शिवसेनेला राजकीय धक्का असल्याचे मानले जात आहे.

    Defeat not only Shashikant Shinde, but also Minister of State for Home Affairs Shambhuraje Desai in Satara District Bank elections

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!