• Download App
    कर्नाटकातल्या पराभवाने मिशन बारामतीत अडथळा नाही; पुरंदरच्या माजी आमदाराचा उद्या भाजप प्रवेश!!|Defeat in Karnataka does not hinder Mission Baramati; Former MLA of Purandar joins BJP tomorrow!!

    कर्नाटकातल्या पराभवाने मिशन बारामतीत अडथळा नाही; पुरंदरच्या माजी आमदाराचा उद्या भाजप प्रवेश!!

    प्रतिनिधी

    पुणे : कर्नाटक मध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते त्यांचे मनोधैर्य खचलेले नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र भाजपने ठरविलेल्या मिशन बारामतीत देखील कोणताही अडथळा उत्पन्न झालेला नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा भाग असलेला पुरंदर तालुक्यातील माजी आमदार अशोक टेकवडे उद्या भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना धक्का बसला आहे पुरंदर मधली राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशामध्ये आहे.Defeat in Karnataka does not hinder Mission Baramati; Former MLA of Purandar joins BJP tomorrow!!



    अशोक टेकावडे हे पुरंदर मधून 2004 ते 2009 राष्ट्रवादीचे आमदार होते. संघटनात्मक पातळीवर देखील त्यांची तिथे मोठी पकड होती. परंतु मधल्या काळात त्यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून राष्ट्रवादीने तिथे त्यांच्या विरोधातील पदाधिकारी नेमले. त्यामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आता कार्यकर्त्यांचा पक्ष उरला नाही. तो पदाधिकाऱ्यांनी कब्जात घेतला आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. तेव्हाच टेकवडे फार काळ राष्ट्रवादीत राहणार नाहीत, असे स्पष्ट झाले होते.

    आता उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बारामतीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करायचा असा चंग भाजपने बांधला आहे. प्रादेशिक घराणेशाही मधल्या अनेक गडांना भाजपने आधीच करून लावला आहे. त्यापैकी आता पवारांचा बारामती नावाचा गड अजून महाराष्ट्रात शिल्लक आहे. त्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे अशोक टेकावडे यांचा भाजप प्रवेश त्याच प्रयत्नांमधला एक भाग आहे.

    Defeat in Karnataka does not hinder Mission Baramati; Former MLA of Purandar joins BJP tomorrow!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!