• Download App
    संभाजी महाराजांची बदनामी, कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी धाडस केले, नारायण राणे यांचा सवाल|Defamation of Sambhaji Maharaj, on whose support Girish Kuber dared, Narayan Rane's question

    संभाजी महाराजांची बदनामी, कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी धाडस केले, नारायण राणे यांचा सवाल

    लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑ फ द मेकिंग ऑ फ महाराष्ट्र या पुस्तकाचा भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी जाहीर निषेध केला आहे. कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे, असेराणे यांनी म्हटले आहे.Defamation of Sambhaji Maharaj, on whose support Girish Kuber dared, Narayan Rane’s question


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकाचा भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी जाहीर निषेध केला आहे.

    कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे, असेराणे यांनी म्हटले आहे.राणे म्हणाले, लोकसत्ताचे संपादक श्रीयुत गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले आहे.



    या लेखनाबद्दल गिरीश कुबेर यांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांच्या या लेखनामुळे मराठा समाजाला दु:ख वाटत आहे. कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे.

    गिरीश कुबेर तुम्ही मयार्दा सोडून हे लेखन केले आहे, त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही.सरकारने तात्काळ या पुस्तकावर देशात आणि राज्यात बंदी घालावी, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनीही केली आहे.

    गिरीश कुबेर यांच्या ह्यरेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग आॅफ महाराष्ट्रह्ण या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतलाय.

    यात लेखकाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केली आहे. यासाठी लेखक कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

    Defamation of Sambhaji Maharaj, on whose support Girish Kuber dared, Narayan Rane’s question

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा